विवेक परब | सहसंपादक :
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आज सकाळी ठीक ०८.०० वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष सदानंद राणे व संस्था सदस्य व चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच दीपक सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेतील विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दीपक सुर्वे यांनी शालेय जीवनातच उत्तम खेळाडू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगा व उत्तम नाव कमवा. खेळ हा माणसाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा उपाय आहे. तसेच सदानंद राणे यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, तुम्ही दररोज खेळण्याचा सराव करा. त्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो. आरोग्य संतुलित राहते. आपल्यापासून रोगराई दूर पळून जाते. मन ताजेतवाने व प्रफुल्लित होते. त्यामुळे दररोज खेळण्याचा सराव ठेवा. शाळेचे क्रीडा शिक्षक वसावे सर यांनी क्रीडा स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. केतकी समीर बावकर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खेळाची शपथ देऊन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सुरुवात केली.