कणकवली | ब्युरो न्यूज : आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराचा शुभारंभ गांगोमंदिर येथे झाला. भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधीत करताना म्हणले की गेल्या १० ते १५वर्षात आशिये गावाला महेश गुरव यांच्या रुपाने नेतृत्व मिळाले आहे त्यामुळेच या गांवाची विकास कामातून ओळख निर्माण झाली आहे. पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला . कारण हा गांव शहरालगत असून विकासात्मक दृष्टया आणखी गतीमान वाटचाल व्हावी. महेश गुरव हे भरघोष मतांनी निवडून येतील यात कोणतीही शंका नाही. गावातील नागरिकांनी गावच्या सर्वांगिण विकासासाठी विरोधी उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करण्यासाठी काम करावे ,असे आवाहन भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराचा शुभारंभ गांगोमंदिर येथे सरपंच शारदा गुरव , विलास खानोलकर , सुहास खानोलकर, उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, सदानंद बाणे, अनिल गुरव , अमोल गुरव , संतोष गुरव , प्रकाश पांचाळ, प्रविण ठाकूर , विठोबा सुरेश गुरव, सुनील बाणे, संजय बाणे, समीर ठाकूर, विलास गुरव , सत्यवान गुरव, रविंद्र गुरव , महादेव ठाकूर, विशाखा गुरव, रश्मी ठाकूर, किशोर बाणे, श्रीपाद बाणे आदींसह गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
विलास खानोलकर म्हणाले, आशिये गावात निवडणूक होणे ही दुर्दवी बाब आहे. गाव बैठकीत सर्वांमते महेश गुरव यांची सरपंच पदासाठी नाव निश्चिती करण्यात आली होती. तरी देखील कुरघोडी झाली आहे. गेल्या २० वर्षात झालेली विकास कामे ही महेश गुरव यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे विरोधी उमेदवाराला निकाला दिवशी आपली ताकद समजेल.
सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव म्हणाले, गावतील जनतेच्या आणि आमदार नितेश राणेंच्या आग्रहाखातर मी सरपंच पदाचा अर्ज भरला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे , माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून गेल्या २० वर्षात कोट्यावधीची विकासकामे आशिये गावात करण्यात आली आहेत. गांवची निवडणूक अनेक वर्षे बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी गेली २५ गावाच्या विरोधात राहणा-या व्यक्तीने अर्ज दाखल केला. आता या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी लक्षणीय उपस्थिती पाहता निवडणूक मी जिंकणारच आहे. मात्र समोरच्या उमेदवाराचे डिपॉझीट सुध्दा राहता कामा नये साठीच आम्ही प्रचार फेरी काढली आहे. पुढच्या ५ वर्षात गावात एकही विकासकाम रखडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो , भारत माता की जय , राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर संपूर्ण गावात महेश गुरव यांच्या प्रचार फेरी काढत कपबशी निशाणी असल्याचे सांगुन प्रचार करण्यात आला. या प्रचारफेरीत महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.