28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

राज्यातील शाळा होणार अनुदानीत ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणमंत्री केसरकरांचा निर्णय.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

राज्यातील शाळांना ११०० कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा शाळा आणि तुकड्यांनाही होणार आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून ६३ हजार ३३८ एवढ्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील शाळा व तुकड्यांना २० % प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर ज्या शाळांना कोणतेही अनुदान नाही त्या शाळांना २० %अनुदान तर ज्या शाळांना २० %अनुदान आहे त्या शाळांना आता ४० % अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सरकारवर आता १ हजार १६० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षकांसह शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार असून शाळांनाही २०% अनुदान देण्यात येणार असल्याने त्याचा फायदा राज्यातील अनेक शाळांना होणार आहे असे समजते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

राज्यातील शाळांना ११०० कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा शाळा आणि तुकड्यांनाही होणार आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून ६३ हजार ३३८ एवढ्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील शाळा व तुकड्यांना २० % प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर ज्या शाळांना कोणतेही अनुदान नाही त्या शाळांना २० %अनुदान तर ज्या शाळांना २० %अनुदान आहे त्या शाळांना आता ४० % अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सरकारवर आता १ हजार १६० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षकांसह शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार असून शाळांनाही २०% अनुदान देण्यात येणार असल्याने त्याचा फायदा राज्यातील अनेक शाळांना होणार आहे असे समजते .

error: Content is protected !!