25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधू रनर्स टीमची गोवा रिव्हर, वसई विरार आणि सैनिक मॅरेथॉन मध्ये उल्लेखनीय कामगिरी.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली. गोवा येथे झालेल्या एस. के. एफ. गोवा रिव्हर मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये सिंधू रनरचे अकरा खेळाडू सहभागी झाले होते. गोवा रिव्हर मॅरेथॉन ही गोव्यामध्ये होणारी आणि अथलेटीक असोसिएशन ऑफ इंडिया मान्यता प्राप्त पूर्ण मॅरेथॉन आहे. यामध्ये ४२, २१, दहा आणि पाच किलोमीटर या प्रकारात तब्बल ११ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. गोवा चिखली ग्रामपंचायत ते झुआरी रिवर असा मॅरेथॉनचा मार्ग होता. जगभरातून जवळपास दोन ते तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. नॅशनल जॉग्रफि ट्रॅव्हलर अवॉर्ड मिळालेल्या या मॅरेथॉनमध्ये सिंधु रनर टीमच्या धावकांनी आपली वेगळी छाप सोडली. डॉक्टर सोमनाथ परब यांनी ४ तास ५६ मिनिटे, डॉक्टर स्नेहल गोवेकर यांनी ४ तास ५७ मिनिटे, ओंकार पराडकर यांनी ४ तास ५७ मिनिटे या वेळेत फुल मॅरेथॉन पूर्ण केली. मेघराज कोकरे याने १ तास ३८ मिनिटे, विनायक पाटील याने २ तास ३ मिनिटे, भूषण पराडकर याने २ तास ८ मिनिटे, मिलिंद शिरोडकर यांनी २ तास २८ मिनिटे, डॉक्टर प्रफुल्ल आंबेरकर यांनी २ तास ३९ मिनिटे, रुपेश भोजने यांनी २ तास ५१ मिनिटे या वेळेत अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली, वर्षा आंबेरकर यांनी १ तास ४० मिनिटात दहा किलोमीटर रन तर ऋषिकेश लवटे याने २२ मिनिटात ५ किलोमीटर रन पूर्ण केले. मुंबईमध्ये झालेल्या वसई विरार या जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या नऊ धावांनी सहभाग नोंदवला. यामध्ये पांडुरंग कदम याने तब्बल ३ तास आणि ७ मिनिटात फुल मॅरेथॉन पूर्ण करून आपले नाव विजयी धावकांच्या यादीत नोंदवले, नरेश मांडवकर याने ३ तास २८ मिनिटात, महादेव बान्देलकर याने ४ तास २९ मिनिटात, निलेश राहणे याने ४ तास ३८ मिनिटात ४२ किलोमीटर अंतर पार केले. रोहित कोरगावकर याने २ तास ८ मिनिटात, मंदार बान्देलकर याने २ तास ५३ मिनिटात, समीक्षा बालकर हिने २ तास ५९ मिनिटात जागृती बान्देलकर हिने ३ तास १९ मिनिटात आणि सचिन लाड याने ३ तास १९ मिनिटात २१ किलोमीटर अंतर पार केले, तसेच स्नेहा शिरसाट हिने २ तासात ११ किलोमीटर अंतर पार केले.
सावंतवाडी येथे झालेल्या सैनिक मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या या दोघा धावपटूंनी तिसरा क्रमांक पटकावला, फ्रँकी गोम्स याने २१ किलोमीटर तसेच रसिका परब हिने ११ किलोमीटर या धाव प्रकारात तिसरा क्रमांक पटकावून टीमचे नाव उंचावले.
अथक प्रयत्न करून सिंधू रनर टीमला नामवंत इंटरनॅशनल धावकांच्या यादीत आपले नाव करता आले याचा सिंधू रन टीमला अभिमान आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्याने हे यश संपादन केले.

सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!