संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलीत पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगांव येथे करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित ‘वळणाच्या वाटेवर’ हा मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख वक्ते सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, शिरगांव हायस्कूल शिरगाव, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शमशुद्दिन अत्तार, ज्युनिअर शिक्षक श्रीम. राणे, श्री. खरात, महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्राध्यापिका सिद्धी कदम, प्राध्यापक वर्ग मिलिंद कदम, शेखर गवस, सुगंधा पवार, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे संयुक्त विद्यार्थी संख्या उपस्थित होते.
यावेळी MPSC,UPSC, IPS,IBPS या केंद्र व राज्य व विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, त्या परीक्षेसाठी नेमकी कोणते पुस्तके अभ्यासावे याचा मार्गदर्शन रेडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार करिअर कट्टा आणि स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापिका विशाखा साटम यांनी केले.