24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे ग्रामीण खेळाडूंसाठी लेदर क्रिकेट सामने खेळण्याची अनोखी संधी…!

- Advertisement -
- Advertisement -

चला लेदर क्रिकेट खेळूया’ उपक्रमा अंतर्गत दोन टी ट्वेंटी सामन्यांमध्ये सहभाग घेता येणार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला ‘तारकर्ली क्रिकेट क्लब’ हा लेदरबाॅल क्रिकेट मधील गुणवत्ता,शिस्त,संधी या कसोट्यांवर लेदरबाॅल क्रिकेट संस्कृती जतन करण्यासाठी कार्यरत असा एक क्रिकेट क्लब आहे. तारकर्ली क्रिकेट क्लब ग्रामीण क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेट प्रतिभेलाही मैदान तथा मंच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.


आता तारकर्ली क्रिकेट क्लबने ग्रामीण भागातील खेळाडूंना लेदर क्रिकेट खेळण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन वर्षात बुधवारी ११ जानेवारीला मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर लेदर क्रिकेटचे दोन टी ट्वेंटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

या सामन्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क असून त्यात केळी आणि दुपारच्या नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे .
ज्या खेळाडूंना या सामन्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३०० रुपये प्रवेश शुल्का सहित आपली नावे हर्षवर्धन रोगे ९४२०९७२५६० आणि गोविंद उर्फ बंटी केरकर – ९६३७२३२१९२ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आयोजक तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे करण्यात आले आहे.

सर्वात प्रथम नांव नोंदणी करणाऱ्या २६ खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली जाईल अशी माहिती वजा घोषणाही तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे करण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'चला लेदर क्रिकेट खेळूया' उपक्रमा अंतर्गत दोन टी ट्वेंटी सामन्यांमध्ये सहभाग घेता येणार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला 'तारकर्ली क्रिकेट क्लब' हा लेदरबाॅल क्रिकेट मधील गुणवत्ता,शिस्त,संधी या कसोट्यांवर लेदरबाॅल क्रिकेट संस्कृती जतन करण्यासाठी कार्यरत असा एक क्रिकेट क्लब आहे. तारकर्ली क्रिकेट क्लब ग्रामीण क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेट प्रतिभेलाही मैदान तथा मंच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.


आता तारकर्ली क्रिकेट क्लबने ग्रामीण भागातील खेळाडूंना लेदर क्रिकेट खेळण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन वर्षात बुधवारी ११ जानेवारीला मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर लेदर क्रिकेटचे दोन टी ट्वेंटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

या सामन्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क असून त्यात केळी आणि दुपारच्या नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे .
ज्या खेळाडूंना या सामन्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३०० रुपये प्रवेश शुल्का सहित आपली नावे हर्षवर्धन रोगे ९४२०९७२५६० आणि गोविंद उर्फ बंटी केरकर - ९६३७२३२१९२ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आयोजक तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे करण्यात आले आहे.

सर्वात प्रथम नांव नोंदणी करणाऱ्या २६ खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली जाईल अशी माहिती वजा घोषणाही तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!