संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले . होते याचा निषेध सोमवारी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ-तळेबाजार या संघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून करण्यात आले.
देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, सचिव राजेंद्र मुंबरकर, सल्लागार श्रीपत टेंबवलकर दीपक नाईक, प्रभाकर साळसकर, अशोक वरेरकर, विलास जामसंडेकर, प्रकाश जाधव, विजय कदम् अनिल पुरळकर, आनंद देवगडकर, समीर शिरगावकर, पी. के कदम, देवदत्त कदम, संदीप हिंदळेकर, सतीश हिंदळेकर, प्रकाश बबन जाधव, गोपाळ देवगडकर, नितेश जाधव आकेश हिंदळेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान हे अवमान करणारे आहे. यापूर्वी
काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही आक्षेपार्ह विधान केले होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये काही महिन्यांपासून महापुरूषांचा अपमान करण्याचे प्रकार घडत आहेत. महापुरूषांमुळेच आज समाज घडला आहे. सर्वांना शिक्षणाची दालने खुली झाली आहेत बहुजन समाजाची प्रगती काहींना पाठवत नाही त्यामुळेच सातत्याने महापुरुषांबाबत अवमानकारक विधाने केली जात आहेत. याचा संघाच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी. वारंवार नेत्यांकडून होणान्या विधानावर तात्काळ बंदी आणावी. तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा. अन्यथा संघाच्यावतीने यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा
इशारा देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन देवगड पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले.