28 C
Mālvan
Sunday, April 27, 2025
IMG-20250426-WA0000
IMG-20240531-WA0007

बांदा शहरात बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी..!

- Advertisement -
- Advertisement -

संबंधितासह अन्य चार साथीदारही पोलिसांच्या ताब्यात….

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात भर दिवसा चोरीच्या उद्देशाने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,बांदा शहरात नवीन महामार्गनजीक असलेल्या इमारतीत हे परप्रांतीय कामगार एका सदनिकेत राहतात.त्याच्या शेजारी अन्य एक सदनिका आहे.या सदनिकेचा मालक आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फ्लॅट बंद करून चावी नजिकच ठेऊन बाजारात निघून गेला.ही संधी साधतं लगतच्या सदनिकेत असलेल्या परप्रांतीय कामगारांने चावी चोरून फ्लॅट उघडला.त्याने आतमध्ये प्रवेश केला.मालक आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आढाळाला. त्यांनी खात्री केली असता चोरटा आतमध्ये असल्याचे निदर्शनास आले.त्याने बाहेरून कडी लावत दरवाज्याला टाळे लावले. याची माहिती मिळताच सरपंच अक्रम खान, माजी सभापती प्रमोद कामत, सागर सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विठोबा सावंत,विजय जाधव,तुषार वाघाटे यांनी घटनास्थळी येत सर्वांसमक्ष दरवाजा उघडला. त्यावेळी टॉयलेटची खिडकी तोडत त्याने पलायन केले.तसेच तात्काळ त्याने नजिकच असलेल्या आपल्या सदनिकेत पाठीमागील खिडकीतून आत जातं आश्रय घेतला.

पोलिसांनी दरवाजा तोडत त्याला ताब्यात घेतले.तसेच त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संबंधितासह अन्य चार साथीदारही पोलिसांच्या ताब्यात….

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात भर दिवसा चोरीच्या उद्देशाने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,बांदा शहरात नवीन महामार्गनजीक असलेल्या इमारतीत हे परप्रांतीय कामगार एका सदनिकेत राहतात.त्याच्या शेजारी अन्य एक सदनिका आहे.या सदनिकेचा मालक आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फ्लॅट बंद करून चावी नजिकच ठेऊन बाजारात निघून गेला.ही संधी साधतं लगतच्या सदनिकेत असलेल्या परप्रांतीय कामगारांने चावी चोरून फ्लॅट उघडला.त्याने आतमध्ये प्रवेश केला.मालक आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आढाळाला. त्यांनी खात्री केली असता चोरटा आतमध्ये असल्याचे निदर्शनास आले.त्याने बाहेरून कडी लावत दरवाज्याला टाळे लावले. याची माहिती मिळताच सरपंच अक्रम खान, माजी सभापती प्रमोद कामत, सागर सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विठोबा सावंत,विजय जाधव,तुषार वाघाटे यांनी घटनास्थळी येत सर्वांसमक्ष दरवाजा उघडला. त्यावेळी टॉयलेटची खिडकी तोडत त्याने पलायन केले.तसेच तात्काळ त्याने नजिकच असलेल्या आपल्या सदनिकेत पाठीमागील खिडकीतून आत जातं आश्रय घेतला.

पोलिसांनी दरवाजा तोडत त्याला ताब्यात घेतले.तसेच त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले.

error: Content is protected !!