मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष कला शाखेतील ओंकार बाबुराव यादव याची बिनविरोध निवड झाली आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची प्रिती अनिल बांदल हिची निवड करण्यात आली.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद २०२२-२३ ची निवड प्रक्रिया आज महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यामध्ये प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, स्टाफ सेक्रेटरी प्रा. के. के. राबते, क्रीडा विभागाच्या प्रा. डॉ.सुमेधा नाईक, IQAC समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले, एनएसएस समन्वयक प्रा. एस. पी. खोबरे, एनसीसीचे प्रा. डॉ. एम. आर. खोत, सांस्कृतिक विभागाचे प्रा. एच. एम. चौगले आदी सहभागी झाले होते.
या विद्यार्थी परिषदेत रथराज धोंडू तुरी (सांस्कृतिक विभाग), तेजस संतोष कातवणकर (एनएसएस विभाग), नारायण रामचंद्र मुंबरकर (एनसीसी विभाग), दीपशिखा रवींद्र रेवंडकर (प्राचार्य (निर्देशित), प्रिती अनिल बांदल (प्राचार्य निर्देशित), चैताली अजय कुणकवळेकर (प्रथम वर्ष कला), कुणाल भगवान बिरमोळे (प्रथम वर्ष वाणिज्य), प्रीतम विलास गावडे (प्रथम वर्ष विज्ञान), प्रणाली आनंद बांदेकर (द्वितीय वर्ष कला), आकाश अनिल तावडे (द्वितीय वर्ष वाणिज्य), गौतमी प्रदीप चव्हाण (द्वितीय वर्ष विज्ञान), सिमरन नंदकिशोर मोंडकर (तृतीय वर्ष कला), प्रिती मंगेश खोबरेकर (तृतीय वर्ष वाणिज्य), विनीत योगेश मंडलिक (तृतीय वर्ष विज्ञान) यांची निवड करण्यात आली. विनीत मंडलीक हा आपली सिंधुनगरी चॅनेल समूहात मालवण प्रतिनिधी म्हणून देखील कार्यरत आहे. विद्यार्थी परिषदेत निवड झाल्याबद्दल विनीत मंडलीक याचे आपली सिंधुनगरी चॅनल समूहाचे मुख्य संचालक श्री. विजय रावराणे, सौ.फिलोमीना पंडित, प्राध्यापक दिनेश किडये, उपसंपादक देवेंद्र गावडे व सहसंपादक प्रसन्ना पुजारे यांच्यासह संपूर्ण समूहाने अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्राचार्य , प्राध्यापक आणि त्यांच्या सहअध्यायिंनी अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी ओंकार यादव याचे विशेष अभिनंदन केले आहे.