26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कोकणच्या राजकारणातील संयमी आक्रमकतेचा ‘अशोक वृक्ष..!’ (श्री.अशोक सावंत, वाढदिवस विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

वाढदिवस विशेष | संपादकीय : ‘राजकारणी’ माणुस निर्माण होणे म्हणजे समाजासमोर,समाजासाठी आणि समाजासोबत राहून आक्रमकतेची ज्योत निर्माण होणे. बहुतांश राजकारणी व्यक्तीमत्वे बनवली जाऊ शकत नाहीत किंवा जन्मजात बनणे सुद्धा दुर्मिळ आहे. एखाद्या व्यक्तिच्या किशोर अवस्थेत किंवा युवा अवस्थेत अशा एका क्षणाचा केंद्र बिंदू येतो की त्या बिंदुतून सामाजीक स्तरावर काहीतरी ठोस करण्याची अनंत किरणे उत्सर्जीत होऊ लागतात. समाज हा माणसांनी तयार होणारा असल्याने ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तथा प्रवृत्ती या तत्वामुळे, या किरणांच्या उद्देशांना मर्यादा नसते किंवा त्याचा ठरावीक असा शास्त्रीय अभ्यास नसतो. जे जपायचे असते ते सगळे स्वयं अध्ययन आणि मनापासून मानलेला एक सामाजीक व राजकीय गुरु.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या घुमडे गावात असेच एक राजकीय ज्योतीने स्वतःला राजकारणात घडवलेले व्यक्तिमत्व आहे.
मालवण पंचायत समितीचे माजी सभापती , सिंधुदुर्गाचे माजी जिल्हा परीषद अध्यक्ष आणि भाजपा विद्यमान जिल्हा सरचिटणीस श्री.अशोक सावंत.
गोळवण इथला जन्म आणि घुमडे गांव ही कर्मभूमी असलेले श्री.अशोक सावंत हे कोकणातील ‘सेल्फ मेड’ राजकारणी व्यक्तिंपैकी एक आहेत.
१९८९/९० सालात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण कणकवली विधानसभा या व्यापक राजकीय प्रवासाच्या सुरवातीला काही होतकरु आक्रमक कार्यकर्त्यांची किंवा तत्कालीन शिवसैनिकांची एक फळी जिल्ह्यात जीव तोडून कार्य करत होती. अशोक सावंत त्याच फळीतील एक ‘स्थानिक नेतृत्व’ होते. शिवसेना घुमडे शाखाप्रमुख असा पदाधिकाराचा श्री गणेशा केल्यानंतर ग्रामीण भागातील जनहीताचा आराखडा, आखणी आणि प्रत्यक्ष काम करताना येणार्या समस्या यांचा अतिशय नेटका अभ्यास अशोक सावंत यांनी जवळपास पाच वर्षे केलेला होता . श्री.नारायण राणे आमदार असताना आणि डाॅ. निलेश राणे खासदार असताना त्यांचा हा अभ्यास त्यांच्या सोबतच्या युवा कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत होता हे मुद्दाम नमूद करावे लागेल.

‘पद,सत्ता आणि अशोक सावंत’ हे समीकरण कधीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग जाणवत नाही, तर याउलट ‘ग्रामीण भाग, ग्राऊंड लेवलचे कार्यकर्ते, आखणी,जोडणी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अभिप्रेत जनहीताच्या विकासकामाची यथाशक्ती अंमलबजावणी’ या समिकरणात ते जास्त रमतात.

सर्व राजकिय प्रवासात प्रपंचासाठी असलेल्या स्वतःच्या कापड दुकानात गेली वीस पंचवीस वर्षे त्यांना तितकासा वेळ देता आला नाही परंतु त्यांचा राजकारणातील सक्रीय सहभाग त्यांच्या सुविद्य पत्नी आणि खूप कमी वयात सामाजीक प्रगल्भ झालेला त्यांचा सुपुत्र राजू या दोघांनी उत्तमपणे स्विकारुन अशोक सावंत यांच्या राजकीय व सामाजीक वाटचालीला एक अत्यावश्यक खंबीर आधार दिलेला आहे. या उदाहरणावरून अशोक सावंत हे यशस्वी राजकीय व्यक्ती आहेत या सोबतच त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची पती म्हणून असणारी सक्षम बांधिलकी आणि पिता म्हणून त्यांनी मुलांसोबत जपलेली आश्वासक प्रतिमा आजच्या सर्वपक्षीय होतकरु युवा वर्गाला आदर्शवत अशीच आहे.

अतिशय मीतभाषी, थोडक्यातच विचारपूर्वक बोलणारे अशोक सावंत हे संयमी आक्रमक कार्यपद्धतीने राजकारणात वावरतात. त्यांची आक्रमकता कधीच आक्रस्ताळी नसते किंवा अनाठायी असल्याचे उदाहरण नाही. त्यांनी त्यांचे व्यापक स्तरावरील राजकीय गुरु म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा नेहमीच सार्थ मागोवा कायम ठेवला म्हणून कदाचित त्यांना राजकीय जीवनात एक ठोस सुकाणू मिळाला.

आज अशोक सावंत यांचा ५९ वा वाढदिवस आहे. वय, राजकारणातील ३५ वर्षांचा थकवा वगैरे त्यांच्या चेहर्यावर कधीच कोणालाच जाणवणार नाही. खच्चीकरण करणार्या शक्तींना त्यांच्या आसपास ते थारा देत नसल्यामुळे ते नेहमी टापटीप व प्रसन्न असतात. श्री.अशोक सावंत यांची तिच प्रसन्नता नेहमी अबाधीत राहो आणि कोकण, सिंधुदुर्ग आणि घुमडे गावच्या प्रगतीसाठी हा जनमानसाच्या समाधानाच्या ध्यासाची शितलता जपणारा हा ‘अशोक वृक्ष’ सदाहरीत राहो या सदिच्छा.

सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल समूह)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वाढदिवस विशेष | संपादकीय : 'राजकारणी' माणुस निर्माण होणे म्हणजे समाजासमोर,समाजासाठी आणि समाजासोबत राहून आक्रमकतेची ज्योत निर्माण होणे. बहुतांश राजकारणी व्यक्तीमत्वे बनवली जाऊ शकत नाहीत किंवा जन्मजात बनणे सुद्धा दुर्मिळ आहे. एखाद्या व्यक्तिच्या किशोर अवस्थेत किंवा युवा अवस्थेत अशा एका क्षणाचा केंद्र बिंदू येतो की त्या बिंदुतून सामाजीक स्तरावर काहीतरी ठोस करण्याची अनंत किरणे उत्सर्जीत होऊ लागतात. समाज हा माणसांनी तयार होणारा असल्याने 'व्यक्ती तितक्या प्रकृती तथा प्रवृत्ती या तत्वामुळे, या किरणांच्या उद्देशांना मर्यादा नसते किंवा त्याचा ठरावीक असा शास्त्रीय अभ्यास नसतो. जे जपायचे असते ते सगळे स्वयं अध्ययन आणि मनापासून मानलेला एक सामाजीक व राजकीय गुरु.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या घुमडे गावात असेच एक राजकीय ज्योतीने स्वतःला राजकारणात घडवलेले व्यक्तिमत्व आहे.
मालवण पंचायत समितीचे माजी सभापती , सिंधुदुर्गाचे माजी जिल्हा परीषद अध्यक्ष आणि भाजपा विद्यमान जिल्हा सरचिटणीस श्री.अशोक सावंत.
गोळवण इथला जन्म आणि घुमडे गांव ही कर्मभूमी असलेले श्री.अशोक सावंत हे कोकणातील 'सेल्फ मेड' राजकारणी व्यक्तिंपैकी एक आहेत.
१९८९/९० सालात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण कणकवली विधानसभा या व्यापक राजकीय प्रवासाच्या सुरवातीला काही होतकरु आक्रमक कार्यकर्त्यांची किंवा तत्कालीन शिवसैनिकांची एक फळी जिल्ह्यात जीव तोडून कार्य करत होती. अशोक सावंत त्याच फळीतील एक 'स्थानिक नेतृत्व' होते. शिवसेना घुमडे शाखाप्रमुख असा पदाधिकाराचा श्री गणेशा केल्यानंतर ग्रामीण भागातील जनहीताचा आराखडा, आखणी आणि प्रत्यक्ष काम करताना येणार्या समस्या यांचा अतिशय नेटका अभ्यास अशोक सावंत यांनी जवळपास पाच वर्षे केलेला होता . श्री.नारायण राणे आमदार असताना आणि डाॅ. निलेश राणे खासदार असताना त्यांचा हा अभ्यास त्यांच्या सोबतच्या युवा कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत होता हे मुद्दाम नमूद करावे लागेल.

'पद,सत्ता आणि अशोक सावंत' हे समीकरण कधीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग जाणवत नाही, तर याउलट 'ग्रामीण भाग, ग्राऊंड लेवलचे कार्यकर्ते, आखणी,जोडणी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अभिप्रेत जनहीताच्या विकासकामाची यथाशक्ती अंमलबजावणी' या समिकरणात ते जास्त रमतात.

सर्व राजकिय प्रवासात प्रपंचासाठी असलेल्या स्वतःच्या कापड दुकानात गेली वीस पंचवीस वर्षे त्यांना तितकासा वेळ देता आला नाही परंतु त्यांचा राजकारणातील सक्रीय सहभाग त्यांच्या सुविद्य पत्नी आणि खूप कमी वयात सामाजीक प्रगल्भ झालेला त्यांचा सुपुत्र राजू या दोघांनी उत्तमपणे स्विकारुन अशोक सावंत यांच्या राजकीय व सामाजीक वाटचालीला एक अत्यावश्यक खंबीर आधार दिलेला आहे. या उदाहरणावरून अशोक सावंत हे यशस्वी राजकीय व्यक्ती आहेत या सोबतच त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची पती म्हणून असणारी सक्षम बांधिलकी आणि पिता म्हणून त्यांनी मुलांसोबत जपलेली आश्वासक प्रतिमा आजच्या सर्वपक्षीय होतकरु युवा वर्गाला आदर्शवत अशीच आहे.

अतिशय मीतभाषी, थोडक्यातच विचारपूर्वक बोलणारे अशोक सावंत हे संयमी आक्रमक कार्यपद्धतीने राजकारणात वावरतात. त्यांची आक्रमकता कधीच आक्रस्ताळी नसते किंवा अनाठायी असल्याचे उदाहरण नाही. त्यांनी त्यांचे व्यापक स्तरावरील राजकीय गुरु म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा नेहमीच सार्थ मागोवा कायम ठेवला म्हणून कदाचित त्यांना राजकीय जीवनात एक ठोस सुकाणू मिळाला.

आज अशोक सावंत यांचा ५९ वा वाढदिवस आहे. वय, राजकारणातील ३५ वर्षांचा थकवा वगैरे त्यांच्या चेहर्यावर कधीच कोणालाच जाणवणार नाही. खच्चीकरण करणार्या शक्तींना त्यांच्या आसपास ते थारा देत नसल्यामुळे ते नेहमी टापटीप व प्रसन्न असतात. श्री.अशोक सावंत यांची तिच प्रसन्नता नेहमी अबाधीत राहो आणि कोकण, सिंधुदुर्ग आणि घुमडे गावच्या प्रगतीसाठी हा जनमानसाच्या समाधानाच्या ध्यासाची शितलता जपणारा हा 'अशोक वृक्ष' सदाहरीत राहो या सदिच्छा.

सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल समूह)

error: Content is protected !!