24.4 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रखर टीका.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक आमदार म्हणून किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवराजेश्वर मंदिराच्या डागडुजीवर लक्ष ठेवले नसल्याचाही आरोप.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी मनविसे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ मनसे नेते अमित इब्रामपूरकरांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांना थेट लक्ष्य करत अनेक आरोप केले आहेत.
राजकीय अनास्था, इच्छा शक्तीचा अभाव आणि विकास कामांच्या परवानग्या कशा व कुठे घ्यायच्या याची निटशी माहिती आमदारांना नसल्याचे प्रतिपादन अमित इब्रामपूरकरांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

६ महिन्यांच्या आत काम होणार पूर्ण होणार अशी गर्जना करत आमदार नाईक यांनी मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या साडे चार कोटीच्या कामाचे भूमिपूजन केले पण आता सात महिने झाले काम अपूर्णच असुन लागणारा एम.सी.झेड.एम.ए.चा नाहरकत दाखला सुद्धा मिळालेला नाही. किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही गेली तीन वर्ष अपूर्ण आहे यावरून आमदार जनतेला फसवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
आमदार नाईक यांनी मे २२ ला भूमिपूजन केले.धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची जागा २०११ च्या परिपत्रक आणि मंजुर नकाशाप्रमाणे सीआरझेड ३ मध्ये आहे. शासकीय कामांना अंतिम मंजुरीसाठी एम.सी.झेड.एम.ए.चा नाहरकत दाखला शासनाच्या पर्यावरण विभागाकडून घ्यावा लागतो. त्यावेळी शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते.पण जिल्यातील सेनेच्या आमदारांची कामे झाली नाहीत. या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर एम.सी.झेड.एम.ए. ( महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण) च्या आतापर्यंत १५ बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीमध्ये राज्यातील सीआरझेड संदर्भातील सुमारे तीस ते पस्तीस प्रकरणे असतात. या झालेल्या बैठकांमध्ये रायगड आणि मुंबईच्या प्रकल्पाना प्राधान्य दिले गेले. आमदार नाईकाना मुंबईत कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागत आहेत म्हणजेच राजकीय अनास्था असल्याने आणि आमदार नाईक यांना प्रकल्पांसाठी कोणत्या आणि कुठे परवानग्या घ्याव्या लागतात माहित नसल्याने सुरु असलेली कामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांचा भविष्यात जनतेला त्रास होणार आहे अशीही खंत अमित इब्रामपूरकरांनी प्रसिद्धीपत्राद्वारे व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव छत्रपती शिवराजेश्वर मंदिर हे किल्ले सिंधुदुर्गवर आहे. त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत गेली ३ वर्षे म्हणजेच कोरोना काळाच्या अगोदर पासून सुरू आहे. या मंदिराच्या चाललेल्या कामावर स्थानिक आमदारांचा लक्ष असणे आवश्यक होते आणि काम अपूर्ण असल्याने संबधितांना जाब विचाराने आवश्यक होते. परंतु छत्रपती शिव-जयंती उत्सवाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पुष्पहार अर्पण करून फोटो काढणे यापलीकडे आमदार वैभव नाईक यांनी काहीच केले नाही असाही आरोप अमित इब्रामपूरकरांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!