23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सोन्याचे ब्रेसलेट मालकास ताब्यात दिले

- Advertisement -
- Advertisement -

श्रीमती सुहासीनी तेंडोलकर यांची सामाजीक अभ्यासपूर्वक समाजसेवा…!

बांदा | राकेश परब : (विशेष वृत्त ) बांद्यातील जेष्ठ समाजसेविका श्रीम. सुहासिनी रुपाजी तेंडोलकर यांना दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बांदा परिसरात सुमारे २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची वस्तू सापडली होती,प्रत्यक्ष चौकशी करुन व मालक न सापडल्याने हॉटसअप व अन्य सोशल मिडियाद्वारे हरवलेल्या वस्तू बाबत आवाहन करण्यात आले, या आवाहानाला अनुसरुन दि.१७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत सुमारे ४५ लोकांनी आपल्या हरवलेल्या वस्तू संदर्भात संपर्क साधला, ज्यामध्ये मंगळसुत्र, बांगडी, अंगठी, चेन, कुडे, मुहूर्तमणी तसेच ब्रेसलेट इत्यादी वस्तूंचा समावेश होता. पैकी ब्रेसलेट हरविलेल्या १५ लोकांनी तेंडोलकर यांना संपर्क केला, श्रीम. सुहासिनी तेंडोलकर यांना सापडलेली वस्तू ब्रेसलेट होेते, त्यास अनुसरुन सर्व १५ लोकांचे पुरावे म्हणून वस्तू वर्णन, किंमत, फोटोज, ग्रॅम, वस्तूची बिले, सुवर्णकार, बँक इत्यादी यांची पडताळणी करण्यात आली, काही व्यक्ती प्रत्यक्ष भेटून खात्री करुन गेल्या.
या सर्वांपैकी हरिश्चंद्र लवू गवस व त्यांची मुलगी डोंगरपाल यांनी केलेले वर्णन जुळत होते, त्याबाबत दि.१९ ऑगस्टला त्यांनी वस्तू आपली असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना कायदेशीर पुरावे उपलब्ध करण्याबाबत सांगण्यात आले, त्याप्रमाणे दि. २६ सप्टेंबर रोजी श्रीम सुहासिनी तेंडोलकर यांच्या सुळभाटले बांदा येथील ‘सिंधुसदन’ निवासस्थानी सर्व साक्षी पुराव्यांची पडताळणी करण्यात आली, सर्व अहवाल लेखी स्वरुपात बनविण्यात आला, श्री हरिश्चंद्र गवस यांचा जवाब घेण्यात आला, वस्तूचे वर्णन,वजन, किंमत, कारागिर इत्यादीची पडताळणी व त्याबाबतचा अहवाल तयार करुन, उपस्थित पंचांसमोर साक्ष नोंदवून वस्तू बाबतचे उपलब्ध पुरावे जुळल्याने, वस्तू सदर मालकाला देण्यात यावी असा निर्णय झाला, या निर्णयाच्या अनुषंगाने श्री हरिश्चंद्र गवस यांच्याकडून वस्तू ताब्यात मिळाल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र करुन घेण्यात आले. हरिश्चंद्र गवस हे गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी दि.१२ ऑगस्ट रोजी बांदा येथे आले होते, ते बँक ऑफ महाराष्ट्र बांदा येथे एटीएम मध्ये गेले असता त्या दरम्याने त्यांचे ब्रेसलेट पडले, त्यानंतर ५ दिवसांनी ते श्रीम तेंडोलकर पेन्शन कामाकरिता बँकमध्ये गेल्या असता, त्यांना ओल्या मातीत लोळलेले हे ब्रेसलट सापडले होते. सर्व वस्तुस्थिती व परिस्थिती जन्य पुरावे तसेच भवानी पतसंस्थेत वस्तू गहाण ठेवलेल्याची पावती, भवानी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांशी संपर्क इत्यादी पुरावे यांच्या आधारे पडताळणी करण्यात आली, यावेळी हरिश्चंद्र गवस यांच्या वतिने साक्षिदार म्हणून डिंगणे डोंगरपाल गावचे माजी सरपंच श्री. नामदेव कृष्णा गवस, तसेच श्री.विनोद लवू गवस (भाऊ) उपस्थित होते, तर श्रीम, तेंडोलकर यांच्या वतिने बांद्यातील प्रतिष्ठित नागरिक श्री चंद्रकांत अमृत सावंत (हिशेबतपासणीस) तसेच अँकॅडमी ऑफ कंम्प्युटर एज्युकेशनचे श्री. मनोज अरविंद मालवणकर, पत्रकार श्रीम. मंगल शांताराम कामत, श्री.आशुतोष भांगले, श्रीम.मीनाक्षी प्रकाश तेंडोलकर इत्यादी उपस्थित होते.
वस्तूच्या संदर्भात बांद्यातील प्रसिद्ध सुवर्णकार श्री.साईराज साळगावकर तसेच श्री.अभी धारगळकर यांनी वस्तूची पहाणी, वजन, किंमत, प्रकार यांचा अहवाल देऊन सहकार्य केले, तसेच भवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. गवस यांनीही सहकार्य केले.तसेच एडव्होकेट संदीप चांदेकर यांचेही सहकार्य लाभले.
हरवलेली आपली वस्तू मिळवून दिल्याबद्दल श्री हरिश्चंद्र गवस व नातेवाईकांनी श्रीम.सुहासिनी तेंडोलकर व कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
श्रीम. सुहासिनी तेंडोलकर यांनी ज्याची वस्तू त्याला मिळाल्या बाबत समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले. अगदी लहानपणी आपल्याला सोन्याच्या अंगठी मिळाली होती व ती तांबळडेग मिठबावच्या श्री. बाबा कुबल नामक गृहस्थांना आपल्या वडिलांनी परत केली ती आठवण त्यांनी सांगितली. यापूर्वीही अशा सापडलेल्या वस्तू श्रीम तेंडोलकर यांनी मालकांपर्यंत पोहचविल्या आहेत, दोन वर्षापूर्वी घरासमोर मोटारसायकलवरुन पडलेेले पुणे येथील युवकांचे सापडलेले एटीएमसह पैशाचे पॉकेट फोनवरुन संपर्क करुन ताब्यात दिले होते.
या निमित्ताने प्रकाश तेंडोलकर यांनी कायेशीर बाब म्हणून सुरक्षीतते करिता सर्वच वस्तू धारकांना वस्तूंची अधिकृत बिले,व वस्तूचे वर्णन इ.तपशिल जपून ठेवण्याबाबत आवाहन केले तसेच त्यांनी बांदा पत्रकार मित्र श्रीम मंगल कामत, श्री.आशुतोष भांगले, श्री.निलेश मोरजकर,श्री.राकेश परब यांचे आभार व्यक्त केले, तसेच या वस्तू बाबत सोशल मिडियावरुन प्रसिद्धि देऊन मालका पर्यंत वस्तू पोहचविण्या करिता केलेल्या सहकार्याबद्दल तमाम मंडळींचे आभार व्यक्त केले. बांदा परिसरातून याबाबत समाधान व्यक्त होत असून या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य आधार घेऊन संपूर्ण वस्तुनिष्ठतेने आणि समाजनिष्ठेने समाजकार्य करायचा एक उत्तम आदर्श श्रीमती सुहासीनी तेंडोलकर यांनी समाजासमोर ठेवला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्रीमती सुहासीनी तेंडोलकर यांची सामाजीक अभ्यासपूर्वक समाजसेवा...!

बांदा | राकेश परब : (विशेष वृत्त ) बांद्यातील जेष्ठ समाजसेविका श्रीम. सुहासिनी रुपाजी तेंडोलकर यांना दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बांदा परिसरात सुमारे २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची वस्तू सापडली होती,प्रत्यक्ष चौकशी करुन व मालक न सापडल्याने हॉटसअप व अन्य सोशल मिडियाद्वारे हरवलेल्या वस्तू बाबत आवाहन करण्यात आले, या आवाहानाला अनुसरुन दि.१७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत सुमारे ४५ लोकांनी आपल्या हरवलेल्या वस्तू संदर्भात संपर्क साधला, ज्यामध्ये मंगळसुत्र, बांगडी, अंगठी, चेन, कुडे, मुहूर्तमणी तसेच ब्रेसलेट इत्यादी वस्तूंचा समावेश होता. पैकी ब्रेसलेट हरविलेल्या १५ लोकांनी तेंडोलकर यांना संपर्क केला, श्रीम. सुहासिनी तेंडोलकर यांना सापडलेली वस्तू ब्रेसलेट होेते, त्यास अनुसरुन सर्व १५ लोकांचे पुरावे म्हणून वस्तू वर्णन, किंमत, फोटोज, ग्रॅम, वस्तूची बिले, सुवर्णकार, बँक इत्यादी यांची पडताळणी करण्यात आली, काही व्यक्ती प्रत्यक्ष भेटून खात्री करुन गेल्या.
या सर्वांपैकी हरिश्चंद्र लवू गवस व त्यांची मुलगी डोंगरपाल यांनी केलेले वर्णन जुळत होते, त्याबाबत दि.१९ ऑगस्टला त्यांनी वस्तू आपली असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना कायदेशीर पुरावे उपलब्ध करण्याबाबत सांगण्यात आले, त्याप्रमाणे दि. २६ सप्टेंबर रोजी श्रीम सुहासिनी तेंडोलकर यांच्या सुळभाटले बांदा येथील 'सिंधुसदन' निवासस्थानी सर्व साक्षी पुराव्यांची पडताळणी करण्यात आली, सर्व अहवाल लेखी स्वरुपात बनविण्यात आला, श्री हरिश्चंद्र गवस यांचा जवाब घेण्यात आला, वस्तूचे वर्णन,वजन, किंमत, कारागिर इत्यादीची पडताळणी व त्याबाबतचा अहवाल तयार करुन, उपस्थित पंचांसमोर साक्ष नोंदवून वस्तू बाबतचे उपलब्ध पुरावे जुळल्याने, वस्तू सदर मालकाला देण्यात यावी असा निर्णय झाला, या निर्णयाच्या अनुषंगाने श्री हरिश्चंद्र गवस यांच्याकडून वस्तू ताब्यात मिळाल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र करुन घेण्यात आले. हरिश्चंद्र गवस हे गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी दि.१२ ऑगस्ट रोजी बांदा येथे आले होते, ते बँक ऑफ महाराष्ट्र बांदा येथे एटीएम मध्ये गेले असता त्या दरम्याने त्यांचे ब्रेसलेट पडले, त्यानंतर ५ दिवसांनी ते श्रीम तेंडोलकर पेन्शन कामाकरिता बँकमध्ये गेल्या असता, त्यांना ओल्या मातीत लोळलेले हे ब्रेसलट सापडले होते. सर्व वस्तुस्थिती व परिस्थिती जन्य पुरावे तसेच भवानी पतसंस्थेत वस्तू गहाण ठेवलेल्याची पावती, भवानी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांशी संपर्क इत्यादी पुरावे यांच्या आधारे पडताळणी करण्यात आली, यावेळी हरिश्चंद्र गवस यांच्या वतिने साक्षिदार म्हणून डिंगणे डोंगरपाल गावचे माजी सरपंच श्री. नामदेव कृष्णा गवस, तसेच श्री.विनोद लवू गवस (भाऊ) उपस्थित होते, तर श्रीम, तेंडोलकर यांच्या वतिने बांद्यातील प्रतिष्ठित नागरिक श्री चंद्रकांत अमृत सावंत (हिशेबतपासणीस) तसेच अँकॅडमी ऑफ कंम्प्युटर एज्युकेशनचे श्री. मनोज अरविंद मालवणकर, पत्रकार श्रीम. मंगल शांताराम कामत, श्री.आशुतोष भांगले, श्रीम.मीनाक्षी प्रकाश तेंडोलकर इत्यादी उपस्थित होते.
वस्तूच्या संदर्भात बांद्यातील प्रसिद्ध सुवर्णकार श्री.साईराज साळगावकर तसेच श्री.अभी धारगळकर यांनी वस्तूची पहाणी, वजन, किंमत, प्रकार यांचा अहवाल देऊन सहकार्य केले, तसेच भवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. गवस यांनीही सहकार्य केले.तसेच एडव्होकेट संदीप चांदेकर यांचेही सहकार्य लाभले.
हरवलेली आपली वस्तू मिळवून दिल्याबद्दल श्री हरिश्चंद्र गवस व नातेवाईकांनी श्रीम.सुहासिनी तेंडोलकर व कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
श्रीम. सुहासिनी तेंडोलकर यांनी ज्याची वस्तू त्याला मिळाल्या बाबत समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले. अगदी लहानपणी आपल्याला सोन्याच्या अंगठी मिळाली होती व ती तांबळडेग मिठबावच्या श्री. बाबा कुबल नामक गृहस्थांना आपल्या वडिलांनी परत केली ती आठवण त्यांनी सांगितली. यापूर्वीही अशा सापडलेल्या वस्तू श्रीम तेंडोलकर यांनी मालकांपर्यंत पोहचविल्या आहेत, दोन वर्षापूर्वी घरासमोर मोटारसायकलवरुन पडलेेले पुणे येथील युवकांचे सापडलेले एटीएमसह पैशाचे पॉकेट फोनवरुन संपर्क करुन ताब्यात दिले होते.
या निमित्ताने प्रकाश तेंडोलकर यांनी कायेशीर बाब म्हणून सुरक्षीतते करिता सर्वच वस्तू धारकांना वस्तूंची अधिकृत बिले,व वस्तूचे वर्णन इ.तपशिल जपून ठेवण्याबाबत आवाहन केले तसेच त्यांनी बांदा पत्रकार मित्र श्रीम मंगल कामत, श्री.आशुतोष भांगले, श्री.निलेश मोरजकर,श्री.राकेश परब यांचे आभार व्यक्त केले, तसेच या वस्तू बाबत सोशल मिडियावरुन प्रसिद्धि देऊन मालका पर्यंत वस्तू पोहचविण्या करिता केलेल्या सहकार्याबद्दल तमाम मंडळींचे आभार व्यक्त केले. बांदा परिसरातून याबाबत समाधान व्यक्त होत असून या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य आधार घेऊन संपूर्ण वस्तुनिष्ठतेने आणि समाजनिष्ठेने समाजकार्य करायचा एक उत्तम आदर्श श्रीमती सुहासीनी तेंडोलकर यांनी समाजासमोर ठेवला आहे.

error: Content is protected !!