निवडणूक विभागाची माहिती.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ११० तर सदस्यपदासाठी ४८७ सदस्य वैध ठरले. सदस्यपदासाठी दाखल झालेल्या ५०० उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये १३ अर्ज अवैध ठरले तर सरपंचपदाचे सर्व ११० अर्ज वैध ठरले. देवगड तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंचपदाच्या ३८ आणि सदस्यपदाच्या ३०२ अशा एकूण ३४० जागांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी एकूण ११० तर सदस्यपदासाठी ५०० अर्ज दाखल झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सरपंचपदाचे सर्व ११० अर्ज वैध ठरले असून सदस्यपदाच्या एकूण ५०० अर्जापैकी ४८७ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.