बांदा | राकेश परब : निरामय आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या ‘पतंजली योग समिती’, डेगवे मार्फत माध्यमिक विद्यालय डेगवे येथे कालपासून संयुक्त योगोपचार शिबिर सुरू करण्यात आले. हे शिबिर ५ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२२ पर्यंत चालू राहील.
या शिबिराचे उद्घाटन डेगवे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सावंत यांनी दिपप्रज्वलन करुन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ऋग्वेदिता देसाई होत्या. यावेळी पतंजली योगसमिती गोवा राज्य प्रभारी विश्वास कोरगांवकर , युवा भारत गोवा राज्य प्रभारी गिरीश परूळेकर , पतंजली योग समिती सिंधुदुर्ग सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, कक्षा प्रमुख सुदन केसरकर, मधुकर देसाई, तात्यास्वार, रंजन पेडणेकर, अनिल मगदूम असे मान्यवर उपस्थित होते.
दिपप्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर विश्वास कोरगांवकर आणि गिरीश परुळेकर यांनी योगाभ्यास घेतला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी उपस्थिती लक्षणीय होती. माध्यमिक विद्यालय डेगवे यांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज आणि जागा मोफत उपलब्ध करून दिले. सर्वांगिण विकासासाठी योगाभ्यास करणे जरुरी आहे असे उद्घाटक मुख्याध्यापक श्री.संजय सावंत यांनी सांगितले.