28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयात कवी बा.भ.बोरकर जयंती उत्सव संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये डाॅ.एम. डी.देसाई सांस्कृतिक सभागृहात मराठी व कोकणी भाषेचे काव्यरचनाकार श्रेष्ठ कवी तसेच पद्मश्री पुरस्काराने सरकारकडून गौरविलेले कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक, कवी, गझलकार, कथालेखक श्री.प्रमोद कोयंडे यांचा कवी बा. भ. बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कवीवर्य बा.भ.बोरकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश कथन केला . सोबत बा. भ. बोरकरांच्या कवितांबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली बांदिवडेकर हिने बा.भ. बोरकरांच्या व्यक्तित्व व साहित्य विषयी संक्षिप्त परिचय करून दिला.

वामनराव महाडीक विद्यालयाचे विद्यार्थी देवेन अनिल दुखंडे, श्रावणी हिरोजी तळेकर, रोहन उमेश कुलकर्णी, मिताली गोपाळ चव्हाण, स्नेहल संतोष तळेकर, दिया किशोर कांबळे, गौरी बाळकृष्ण भोगले, वरूण रवींद्र जठार, विराज संजय नांदलस्कर यांनी बा.भ.बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन करून कार्यक्रमास रंगत आणली.
बा.भ. बोरकर जयंती निमित्ताने बाबांच्या कवितांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टीने कवी प्रमोद कोयंडे यांनी ‘बोरकरांच्या कवितांचे वाचन केले तसेच भावार्थ कथन केला. याप्रसंगी प्रमोद कोयंडे यांनी पांयंजणा, जलद भरुनी आले, स्वातंत्र्याची सिंहगर्जना, जीवन त्यांना कळले हो, तू गेल्यावर, इतुक्या लवकर येई ना मरणा, ज्ञानदेव गेले तेव्हा, सगळे काही सरते रे, स्वातंत्र्याचा दीपोत्सव, क्षितिजी आले भरतें ग इत्यादी प्रसिद्ध मराठी व कोकणी कवितांचे वाचन व आशय प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर प्रमोद कोयंडे यांनी केलेल्या ‘ पांयंजणा ‘ या कवितेच्या सुरेल गायनाने उपस्थित विद्यार्थीवर्गावर गारुड केले. अंतिमतः ‘क्षितिजी आले भरतें ग’ या कवितेच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची बहार द्विगुणित केले.
कार्यक्रमाचे नियोजन वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. एन.पी.गावठे व प्रा. ए बी कानकेकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी सुष्मिता गुरव व आभार साक्षी नेवरेकर हिने मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये डाॅ.एम. डी.देसाई सांस्कृतिक सभागृहात मराठी व कोकणी भाषेचे काव्यरचनाकार श्रेष्ठ कवी तसेच पद्मश्री पुरस्काराने सरकारकडून गौरविलेले कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक, कवी, गझलकार, कथालेखक श्री.प्रमोद कोयंडे यांचा कवी बा. भ. बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कवीवर्य बा.भ.बोरकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश कथन केला . सोबत बा. भ. बोरकरांच्या कवितांबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली बांदिवडेकर हिने बा.भ. बोरकरांच्या व्यक्तित्व व साहित्य विषयी संक्षिप्त परिचय करून दिला.

वामनराव महाडीक विद्यालयाचे विद्यार्थी देवेन अनिल दुखंडे, श्रावणी हिरोजी तळेकर, रोहन उमेश कुलकर्णी, मिताली गोपाळ चव्हाण, स्नेहल संतोष तळेकर, दिया किशोर कांबळे, गौरी बाळकृष्ण भोगले, वरूण रवींद्र जठार, विराज संजय नांदलस्कर यांनी बा.भ.बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन करून कार्यक्रमास रंगत आणली.
बा.भ. बोरकर जयंती निमित्ताने बाबांच्या कवितांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टीने कवी प्रमोद कोयंडे यांनी 'बोरकरांच्या कवितांचे वाचन केले तसेच भावार्थ कथन केला. याप्रसंगी प्रमोद कोयंडे यांनी पांयंजणा, जलद भरुनी आले, स्वातंत्र्याची सिंहगर्जना, जीवन त्यांना कळले हो, तू गेल्यावर, इतुक्या लवकर येई ना मरणा, ज्ञानदेव गेले तेव्हा, सगळे काही सरते रे, स्वातंत्र्याचा दीपोत्सव, क्षितिजी आले भरतें ग इत्यादी प्रसिद्ध मराठी व कोकणी कवितांचे वाचन व आशय प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर प्रमोद कोयंडे यांनी केलेल्या ' पांयंजणा ' या कवितेच्या सुरेल गायनाने उपस्थित विद्यार्थीवर्गावर गारुड केले. अंतिमतः 'क्षितिजी आले भरतें ग' या कवितेच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची बहार द्विगुणित केले.
कार्यक्रमाचे नियोजन वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. एन.पी.गावठे व प्रा. ए बी कानकेकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी सुष्मिता गुरव व आभार साक्षी नेवरेकर हिने मानले.

error: Content is protected !!