23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कणकवलीत मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचे उत्साहपूर्ण स्वागत.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे सुपुत्र, युवा नेतृत्व तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मनसे पदाधिकारी व कार्यकत्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मनसे पक्ष व राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाभरातील मनसे कार्यकर्ते श्री. ठाकरे यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.

ठाकरे हे मालवण तालुक्यातून मसुरे आंगणेवाडीतून आचरामार्गे सकाळी ११.३० वाजता कणकवलीत दाखल होणार होते. त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची आप्पासाहेब पटवर्धन चौकात प्रचंड गर्दी जमली होती. कोणत्याही पक्षाचे नसलेल्या पण, राज ठाकरे यांना प्रत्यक्ष बघू इच्छिणाऱ्यांचीही गर्दी मोठी होती. गर्दी वाढत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकासह महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दुपारच्या सुमारास ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा कणकवलीत दाखल झाला अन् मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. ढोलपथकाने परिसर निनादून सोडला. कार्यकर्त्यांनी ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री आदींसह मनसे पदाधिकाऱ्यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी वाहनामधून न उतरता केवळ फुट स्टँडवर पाय ठेवला व पुष्पगुच्छ स्विकारत उपस्थितांना हात जोडत अभिवादन स्विकारले. त्यानंतर ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे मार्गस्थ झाला.

फोटो सौजन्य | कणकवली ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे सुपुत्र, युवा नेतृत्व तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मनसे पदाधिकारी व कार्यकत्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मनसे पक्ष व राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाभरातील मनसे कार्यकर्ते श्री. ठाकरे यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.

ठाकरे हे मालवण तालुक्यातून मसुरे आंगणेवाडीतून आचरामार्गे सकाळी ११.३० वाजता कणकवलीत दाखल होणार होते. त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची आप्पासाहेब पटवर्धन चौकात प्रचंड गर्दी जमली होती. कोणत्याही पक्षाचे नसलेल्या पण, राज ठाकरे यांना प्रत्यक्ष बघू इच्छिणाऱ्यांचीही गर्दी मोठी होती. गर्दी वाढत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकासह महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दुपारच्या सुमारास ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा कणकवलीत दाखल झाला अन् मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. ढोलपथकाने परिसर निनादून सोडला. कार्यकर्त्यांनी 'राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो' अशा घोषणा दिल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री आदींसह मनसे पदाधिकाऱ्यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी वाहनामधून न उतरता केवळ फुट स्टँडवर पाय ठेवला व पुष्पगुच्छ स्विकारत उपस्थितांना हात जोडत अभिवादन स्विकारले. त्यानंतर ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे मार्गस्थ झाला.

फोटो सौजन्य | कणकवली ब्युरो

error: Content is protected !!