24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी मुंबई गाठायची गरज नसेल अशा सोयी उपलब्ध करणार : ब्रिगेडियर सुधीर सावंत

- Advertisement -
- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद; जिल्हाप्रमुख संजय आंग्रेनीही केला जनतेसाठी प्राधान्याने विकास कामांचा पुनुरोच्चार.

कणकवली | प्रतिनिधी : ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या’ ध्येयधोरणांमध्ये प्रत्येक गावात विकासाची कामे आणि रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. समृद्ध आणि आनंदी गाव ही योजना आपण राबविणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सकारत्मकता दाखवली आहे. महिला बचतगटांना ५० लाखापर्यंत निधी उपलब्ध करुन देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता असे अभियान पक्षामार्फत राबविण्यात येणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते, ब्रिगेडियर सुधीर सावंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले. कणकवलीत काल संपन्न झालेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्ष’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख एम. एम. सावंत, शेखर राणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, समन्वयक सुनिल पारकर, भूषण परुळेकर, भास्कर राणे, शरद वायंगणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमेरिका येथून आलेली टीम आहे, त्यांनी १ हजार एकर बांबू लावला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला आहे. त्यामुळे बांबू लागवड करण्यासाठी विशेष मोहीम
जिल्ह्यात राबविली जाणार आहे. गावाच्या समृध्दीसाठी करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असून त्यामार्फत रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले जाणार आहे. फळप्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी विक्री व्यवस्था निर्माण केली पाहिजे तरच गावचा विकास होईल. आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम केलं पाहिजे. प्रत्येक गावात क्रीडा संकुल उभारण्याची गरज आहे. तरुणांना मुंबईत रोजगारासाठी जावे लागणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत, असे सुधीर सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात युतीचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्याबाबत आम्ही आकडेवारी जाहीर करणार आहोत. आमच्या पक्षात प्रवेश केले जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही लढत आहोत, याबाबत लवकरच धोरण आम्ही जाहीर करणार आहोत. अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर आम्ही आमचे सरपंच व सदस्य किती लढत आहेत, याची माहिती जाहीर करणार आहोत, असे संजय आग्रे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात फोंडाघाट येथील संजना हळदिवे यांनी प्रवेश केला. त्यांना पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देत सुधीर सावंत व वर्षा कुडाळकर यांनी स्वागत केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद; जिल्हाप्रमुख संजय आंग्रेनीही केला जनतेसाठी प्राधान्याने विकास कामांचा पुनुरोच्चार.

कणकवली | प्रतिनिधी : 'बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या' ध्येयधोरणांमध्ये प्रत्येक गावात विकासाची कामे आणि रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. समृद्ध आणि आनंदी गाव ही योजना आपण राबविणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सकारत्मकता दाखवली आहे. महिला बचतगटांना ५० लाखापर्यंत निधी उपलब्ध करुन देण्याचाही आमचा प्रयत्न आहे.. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता असे अभियान पक्षामार्फत राबविण्यात येणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते, ब्रिगेडियर सुधीर सावंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले. कणकवलीत काल संपन्न झालेल्या 'बाळासाहेबांची शिवसेना पक्ष' कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख एम. एम. सावंत, शेखर राणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, समन्वयक सुनिल पारकर, भूषण परुळेकर, भास्कर राणे, शरद वायंगणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमेरिका येथून आलेली टीम आहे, त्यांनी १ हजार एकर बांबू लावला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला आहे. त्यामुळे बांबू लागवड करण्यासाठी विशेष मोहीम
जिल्ह्यात राबविली जाणार आहे. गावाच्या समृध्दीसाठी करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असून त्यामार्फत रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले जाणार आहे. फळप्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी विक्री व्यवस्था निर्माण केली पाहिजे तरच गावचा विकास होईल. आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम केलं पाहिजे. प्रत्येक गावात क्रीडा संकुल उभारण्याची गरज आहे. तरुणांना मुंबईत रोजगारासाठी जावे लागणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत, असे सुधीर सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात युतीचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्याबाबत आम्ही आकडेवारी जाहीर करणार आहोत. आमच्या पक्षात प्रवेश केले जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही लढत आहोत, याबाबत लवकरच धोरण आम्ही जाहीर करणार आहोत. अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर आम्ही आमचे सरपंच व सदस्य किती लढत आहेत, याची माहिती जाहीर करणार आहोत, असे संजय आग्रे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात फोंडाघाट येथील संजना हळदिवे यांनी प्रवेश केला. त्यांना पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देत सुधीर सावंत व वर्षा कुडाळकर यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!