कणकवली | उमेश परब : गोवा राज्य पर्यटनाच्या दृष्टीने पुढे गेले आहे.त्या तुलनेत आपण मागे राहिलो आहोत सिंधुदुर्गात समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचा फायदा घेऊन रोजगार निर्मिती केली पाहिजे.कणकवली नगरपंचायत देखील पर्यटनाच्या दृष्टीने कणकवली गणपती साणा येथे पर्यटकांसाठी धबधबा उभारणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष नलावडे यांनी केली.
कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशन कार्यक्रमात पर्यटन व्यवसायिकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,प्रा. हरिभाऊ भिसे,पर्यटक व्यवसायिक उपस्थित होते.
नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले,कणकवलीत दर वर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करत आहोत,नगरपंचायत पर्यटन दृष्टीने उपक्रम कणकवलीत राबविले जात आहेत.कणकवलीत धबधबा निर्माण करण्याचे काम नगरपंचायतने हाती घेतले आहे . त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था ,फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांना कोणतीही मदत आपण करण्यास तयार आहोत असे आश्वासनही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले.
परशुराम उपरकर म्हणाले, पर्यटनासाठी आपल्याकडे जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना योग्य रस्ते उपलब्ध नाहीत.देवबाग,तारकर्ली जलक्रीडासाठी मोठे पर्यटन स्थळ आहे. तसेच आंबोली देखील मोठे पर्यटन क्षेत्र असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटकांना नुकसान सोसावे लागले आहे. बहुतेक पर्यटकांची परदेशी जाण्याची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे त्याचा फायदा पर्यटन व्यवसायिकांनी घ्यायला हवा. पुन्हा पर्यटनास सुरुवात करून आपली प्रगती करावी.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशन , सिंधुदुर्ग टुरिझम पुरस्कार २०२१ चे मानकरी १. बेस्ट ॲग्रो टुरिझम पुरस्कार मामाचो गाव , श्री . अनंत विष्णू सावंत , हिर्लोक , ता . कुडाळ २. बेस्ट हॉटेल टुरिझम पुरस्कार हॉटेल साई सुरभी , श्री . विजय गावडे , रामेश्वर प्लाझा , ता . सावंतवाडी बेस्ट फूड टुरिझम पुरस्कार आरेकर्स रेस्टॉरंट , श्री . निलेश गजानन आरेकर , खासकिलवाडा , ता . सावंतवाडी ४. बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार ग्रीन ग्रास रिसॉर्ट , श्री . विष्णु धोंडी चव्हाण , आंबोली , ता . सावंतवाडी ५. बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार दादा वेंगुर्लेकर बीच हाऊस , श्री . हरिश्चंद्र तुकाराम वेंगुर्लेकर , वायरी तारकर्ली , ता . मालवण ६. बेस्ट हॉस्पिट्यालिटी टुरिझम पुरस्कार वृंदावन रेसिडेन्सी न्याहारी व निवास , श्री . हेमंत गजानन चोपडेकर , तुळशीनगर , ता . देवगड ७. बेस्ट इको टुरिझम अँड व्हिडिओग्राफी पुरस्कार कोकणी रान माणूस इको टुरिझम , श्री . प्रसाद गावडे , ता . सावंतवाडी ८. बेस्ट बँक वॉटर टूरिझम पुरस्कार महालक्ष्मी वॉटर स्पोर्टस् , श्री . राजन धर्माजी कुमठेकर , देवबाग , ता . मालवण ९ . बेस्ट गाईड टुरिझम पुरस्कार गणेश टुरिझम गाईड सर्व्हिसेस , श्री . गणेश अभिमन्यू पाडगांवकर , ता . मालवण १०. बेस्ट मेडिकल टुरिझम पुरस्कार आजोळ ज्येष्ठ नागरिक वैद्यकिय पर्यटन केंद्र , डॉ . विवेक एकनाथ रेडकर , नेरुर , ता . कुडाळ ११. बेस्ट साहस शौर्यवीर पुरस्कार मालवण आपत्कालीन ग्रुप मालवण बंदर जेटी , मालवण या संस्थेला मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.