मालवण | (सहिष्णू पंडित / विनीत मंडलिक) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचे मालवणात सायंकाळी ६ वाजता आगमन झाले .
त्यांच्या सोबत म.न.वि से अध्यक्ष श्री. अमित ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर , सचिन गोळे हे देखिल मालवण दौर्यावर आले आहेत.
कुंभारमाठ येथील हाॅटेल जानकी येथे श्री राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर व मनविसे शहर अध्यक्ष वैभव माणगांवकर , मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव , शिरीष सावंत, निशा आजगावकर, माया माणगांवकर, वैष्णवी सरफरे, सुजाता फाटक, साक्षी चुडनाईक, भारती वाघ, अविनाश अभ्यंकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विल्सन गिरकर, ज्येष्ठ नेते अमित इब्रामपूरकर, उदय गावडे, संदीप लाड यांसह हॉटेल व्यावसायिक विनय गांवकर, मालवण येथील व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटये, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर व अन्य व्यापारी आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. व्यापारी यांनी टोल प्रश्नी, भूमिगत वीज वहिनी प्रश्नी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
गेले काही दिवस मालवण शहर व परिसरातील मनसैनिक व मनविसे युवावर्ग मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या या मालवण भेटीसाठी प्रचंड आतुर होता. आगामी ग्रामपंचायत निवडणुका व पक्ष मजबुतीकरण या साठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे अनेक मनसैनिकांनी उत्साहाने स्पष्ट केले आहे.
हाॅटेल जानकी येथून आता मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे व मनसैनिकांचा ताफा देवबागकडे रवाना झाला आहे.