संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेने सन २०१४ पासून महाराष्ट्रातील असंख्य रिक्त असलेल्या जागा या ५०% पदोन्नतीने व ५०% प्राथमिक शिक्षकातून विभागीय स्पर्धा परीक्षा ने भरण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला या सततच्या पाठपुराव्यामुळे आज दिनांक १ डिसेंबर २०२२ ला महाराष्ट्र शासनाने केंद्रप्रमुखांची पदे ही प्राथमिक शिक्षकांमधूनच भरण्यात यावी असे सुचित करून ५०% पदोन्नती व ५०% विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन ही पदे ज्या ज्या प्रमाणे रिक्त होतील त्या त्या प्रमाणात ती भरल्या जाणार आहेत.
पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी संघटना पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा ही असून संघटनेच्या लढ्याला फार मोठे यश यामुळे प्राप्त झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रमुख सभेचे राज्य अध्यक्ष सरचिटणीस व सर्व स्तरावरील पदाधिकारी यांनी राज्यभर निवेदन देऊन सतत प्रयत्न केले व प्राथमिक शिक्षकांना अखेर न्याय मिळवून दिला अशीच भावना व्यक्त होत आहे.