30 C
Mālvan
Saturday, April 26, 2025
IMG-20250426-WA0000
IMG-20240531-WA0007

अविनाश पराडकर यांची भाजपा प्रदेश मिडिया वाॅर प्रमुखपदी नियुक्ती.

- Advertisement -
- Advertisement -

मूळ कोळंब सर्जेकोटचे सुपुत्र असलेले अविनाश पराडकर सर्वांगीण राजकीय व सामाजिक अभ्यासाचे परख़ड लेखक म्हणून प्रसिद्ध.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मिडिया आणि मिडिया मॅनेजमेंट वॉररूमच्या प्रमुखपदी सिंधुदुर्गातील अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातुन जाहीर केली गेली आहे.

मीडिया वॉररूम ही भारतीय जनता पक्षाची महत्वाकांक्षी योजना असून त्यावर भाजपाची केंद्रीय व प्रदेश यंत्रणा समन्वय राखून एकत्रित काम करत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात सोशल मीडिया यंत्रणा भक्कम करण्यात येत आहे. या वॉररूमवर अविनाश पराडकर यांची झालेली नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून भाजपा कार्यकर्त्यांनी व सिंधुदुर्ग सोशल मीडिया टीमने त्याचा आनंद व्यक्त केला आहे. चांगल्या कामाची दखल भाजपात निश्चितच घेतली जाते हे यातून दिसून आले, असे मत सिंधुदुर्ग सोशल मिडिया जिल्हा संयोजक श्री समीर प्रभुगांवकर यांनी व्यक्त केले आहे.

अविनाश पराडकर यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नुकताच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा झाला त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या बैठकीत पराडकर यांच्यावर प्रदेशाची महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार काल त्यांनी अविनाश पराडकर यांच्या वॉररूम प्रमुखपदाच्या नियुक्तीची घोषणा करत सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुखद धक्का दिला आहे.

मालवण जवळील कोळंब सर्जेकोटचे सुपुत्र असलेले अविनाश पराडकर हे त्यांच्या परख़ड व वस्तुनिष्ठ राजकीय व सामाजिक अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!