क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संबंधीत प्रणाली कार्यान्वीत .
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र राज्यात राज्य-राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणीसाठी क्रीडा विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने क्रीडा संचलनालय व मंत्री महोदयांकडे अनेक वेळा मागणी केली होती, अखेर आज ते साकारत आहे.
यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देवल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, क्रीडा विभाग क्रीडा विभागाचे उप सचिव सुनिल हंजे उपस्थित होते.
क्रीडा प्रमाणपत्र वैधता मिळविण्यासाठी खेळाडूंना हेलपाटे मारावे लागत होते. तसेच प्रत्येक विभागात प्रमाणपत्र वैधतेबाबत विसंगती होती. तसेच बोगस खेळाडूंचे प्रमाणपत्रही प्रमाणित होत असे त्यामुळे चांगल्या खेळाडूवर अन्याय होत असे. ऑनलाईन प्रणालीने मात्र या गोष्टीला आळा बसून व्हेरीफिकेशनचा मार्ग सुकर होणार आहे. क्रीडा युवक सेवा संचलनाल्याचे उपसंचालक, सह संचालक, आयुक्त यांचे क्रीडा शिक्षक महासंघाचे वतीने शासनाच्या या कार्यप्रणालीचे स्वागत करण्यात आले आहे.