24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ओसरगांव टोल नाक्यावरील टोल वसुलीचे कंत्राट गणेश गढ़ीया कंस्ट्रक्शन, राजस्थान या कंपनीला.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्गात महामार्गावर ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता गणेश गढ़ीया कंस्ट्रक्शन, राजस्थान या कंपनीला हा टोल ठेका मिळाला आहे. याबाबत आज एका दैनिकात उद्या १ डिसेंबर २०२२ पासून टोल वसुली करण्यासाठी जाहीर नोटीस जाहिरात स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ओसरगांव टोलनाक्यावर उद्यापासून टोल वसुली होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यामुळे सिंधुदुर्गात आता टोलवसुलीला उद्यापासून प्रारंभ होणार हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका मांडली होती. व त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टोकाचा विरोध केला आहे.
ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुलीसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार कंपनीकडून दिवसाला ७ लाख ५२ हजार ३७८ रुपये टोलवसुली केली जाणार आहे. टोलवसुली प्रत्यक्ष सुरु केल्यापासून तीन महिन्यापर्यंत या ठेकेदार कंपनीचा कालावधी असणार आहे. दिवसाला या कंपनीकडून किती टोलवसुली केली जाते? अन्य बाबींची कितपत पुर्तता केली जाते यावरच रिटेंडर किंवा याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा की नाही हे अवलंबून असणार आहे.

टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे डिपॉझिटची रक्कम भरल्यानंतर या कंपनीला रितसर वर्कऑर्डर देत टोल वसुली जाहीर नोटीस बजावली आहे. या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी येत्या दोन दिवसात क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द केली आहे.

त्यानुसार स्थानिकांना खासगी वाहनांना ३१५ रुपये दर महिना पास असणार आहे. एकावेळेसाठी ९० रुपये ते ५८५ रुपये एवढी रक्कम वाहनांना आकारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र स्थानिक वाहनांना ठरवून दिलेले शुल्क आकारून ३१५ पास दिला जाणार आहे. महामार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना आता टोलचा भुर्दंड बसणार हे आता निश्चित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पासिंग असलेल्या वाहनातून मुक्ती देण्याच्या घोषणा हवेतच विरण्याची भीती निर्माण झाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!