श्रावण | गणेश चव्हाण : गवळी समाजातील विद्यार्थी हुशार आणि संस्कारक्षम बनावा यासाठी गवळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नियमित विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून, वेळोवेळी सहकार्य करत असतात. तसेच समाजातील गोरगरीब बांधवांना सहकार्य करत असतात. याची प्रेरणा तुम्ही बालवयात घेऊन चांगला अभ्यास करुन मोठे व्हावे व हे समाजाचे ऋण फेडावे. असे मार्गदर्शन श्रावण गावचे माजी सरपंच व गवळी समाज्याचे ज्येष्ठ सल्लागार अंकुश लाड यांनी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना श्रावण येथे विद्यार्थ्यांना केले.
महाराष्ट्र चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा सिंधुदुर्ग या गवळी समाजाच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमांत बोलतांना अंकुश लाड पुढे म्हणाले, गवळी समाज एकजुटीचा प्रत्यय आणि आदर्श इतर समाजाने घ्यावा असे गवळी समाजाचे कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालले आहे. गवळी समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य समाज बांधव एकजुटीने काम करताना दिसत आहेत. या समाजामार्फत आपल्या समाजात गवळी समाजातील विद्यार्थ्यांना संघटनेचे नेहमी सहकार्य असते.
यावेळी श्रावणचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय गवळी, प्रमोद गवळी, मंगेश यादव, गवळी समाजाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रसेन लाड, जितेंद्र लाड, प्रतिक चौकेकर, वैभव यादव, चंद्रकांत यादव, सूर्यकांत पंदारे, सुहासिनी पंदारे, महेश गवळी, पत्रकार गणेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पहिली ते दहावी मधील, कु. तन्वी गवळी, कु. प्रतिक्षा चौकेकर, रेवती लाड, अथर्व गवळी, ओमकार लाड, निलज लाड, अर्णव गवळी, वैष्णवी यादव, दुर्वा यादव, मयुरेश यादव, सारन्या लाड आदी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मंगेश यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.