26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जागतीक पर्यटन दिन

- Advertisement -
- Advertisement -

पर्यटन…एक आस्था…!

सिंधुदुर्ग | संपादकीय : गेली दोन दशके ,जागतीक पर्यटनाच्या विविध पदरांचा अभ्यास करताना एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की पर्यटनाद्वारे आर्थिक उलाढाल ही गोष्ट रोजगाराची संधी देते. ही रोजगाराची संधी ही पर्यटनाइतकीच पर्यावरणावरदेखिल अवलंबून असते. म्हणजेच पर्यटन आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टी परस्परांसाठी पूरक आहेत हे शास्त्रीय अभ्यासाने, विविध अहवालांनी आणि नागरी आर्थिक व्यवस्थेच्या आकड्यांनी सिद्ध केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक पर्यटन प्रणाली ही सध्यातरी खूप बाल्यावस्थेत असली तरिही देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर जिल्ह्याला पर्यटनाची दिशा आणि व्यवसायिकांचा आर्थिक स्तर नियमितपणे उंचावला जात आहे. दोन हजार सालानंतर जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी,पर्यटकांसाठी मुलभूत सोयीसुविधांची माहिती घेत हाॅटेल्स, लाॅज,होम स्टेज (न्याहरी निवास)वगैरे मुलभूत गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला. ह्यासोबतच पाहुणचाराचे शिष्टाचार, अदब वगैरे अत्यावश्यक गोष्टींनाही स्थानिक युवावर्ग आत्मसात करु लागला. जिल्ह्यातील अर्थभिडस्त मालवणी माणुस आता सरकारच्या विविध योजनांद्वारे पर्यटनातून रोजगार निर्मितीच्या शक्यतांचाही सकारात्मक विचार करु लागला.
निव्वळ परदेशी पाहुणे आले तरच पर्यटन होते हा गैरसमज दूर होऊन देशांतर्गत पर्यटकांनाही आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना जोर धरुन लागला.
स्थळदर्शनासोबतच साहसी जलक्रिडा, ट्रेकींग, कॅम्पिंग आदींचाही पर्यटनाच्या प्रमुख पटलावर विस्तार होऊ लागला. छोट्या छोट्या सोयींसाठी व्यावसायिकांनी स्थानिक व्यापारी आणि तंत्रज्ञांचा पाठपुरावा करुन व्यापारातही पर्यटनाचे चलन खणखणीत कसे राहील हे दाखवून दिले.
तुरळक अपवाद वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणताच पर्यटन व्यवसाय हा अगदी छप्परफाड कमाई करु शकला नसला तरिही व्यावसायिकांनी तोट्यात जाऊन जीवाचे काही बरे वाईट केल्याच्याही नोंदी नक्कीच नाहीत.
या सर्व गोष्टींवरुन एक लक्षात येते की जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक आणि जिल्ह्यात येणारा पर्यटक हे दोघेही ‘पर्यटन’ या संकल्पनेकडे एका आस्थेने पहात आले आहेत.
शेजारील गोवा राज्यातील ऐकिव अनुचित प्रकार हे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायासाठी एक व्यावसायिक धडा ठरत आहेत.

आजचा युवा पर्यटक व पर्यटन व्यावसायिक हे दोघेही आजच्या पर्यटनाचा विचार करताना पर्यावरणाचे महत्व जाणत आहेत आणि आणखी जागृती करुन घेण्यासही उत्सुक आहेत. त्यासाठीच पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन ही संकल्पना आता सर्वांसाठी एक पर्यटन व्यवसाय अभ्यासक्रम असल्यासारखीच आहे.
लोकप्रतिनिधी, शासन,प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांमध्येच पर्यटनवाढीची आस्था वाढताना दिसत आहे.
बेकारी ही समस्या पर्यटनाद्वारा दूर होतेच शिवाय पर्यटनाचे सत्पात्र शिक्षण घेतल्यानंतर गावचा,शहराचा व एकूणच जिल्ह्याच्या मानसिकतेचा बौद्धीक विकास होतो हेही अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

पर्यटनाच्या आणखी विविध स्तरांचाही भविष्यात विचार केला जाईल अशी आशा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्यासाठी मैदाने व क्षेत्र उपलब्ध आहेत. त्याद्वारे क्रिडा पर्यटन ही संकल्पनाही भविष्यात राबवित येऊ शकते. त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांचा विविध खेळाच्या क्रिडा संघटनांशी संवाद होणे हा प्राथमिक टप्पा असेल.

जेवणखाण,सुखसोयी यासोबतच शाश्वत पर्यटनाच्या आस्थेची देवाण घेवाण करणे हा शाश्वत संकल्पच पर्यटन दिनाच्या दिवशी करुन त्याचा पाठपुरावा केला तरी जिल्ह्यातील तरुण आणि पर्यटन व्यवसाय सदैव हिरवागार राहील यात शंकाच नाही.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पर्यटन...एक आस्था...!

सिंधुदुर्ग | संपादकीय : गेली दोन दशके ,जागतीक पर्यटनाच्या विविध पदरांचा अभ्यास करताना एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की पर्यटनाद्वारे आर्थिक उलाढाल ही गोष्ट रोजगाराची संधी देते. ही रोजगाराची संधी ही पर्यटनाइतकीच पर्यावरणावरदेखिल अवलंबून असते. म्हणजेच पर्यटन आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टी परस्परांसाठी पूरक आहेत हे शास्त्रीय अभ्यासाने, विविध अहवालांनी आणि नागरी आर्थिक व्यवस्थेच्या आकड्यांनी सिद्ध केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक पर्यटन प्रणाली ही सध्यातरी खूप बाल्यावस्थेत असली तरिही देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर जिल्ह्याला पर्यटनाची दिशा आणि व्यवसायिकांचा आर्थिक स्तर नियमितपणे उंचावला जात आहे. दोन हजार सालानंतर जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी,पर्यटकांसाठी मुलभूत सोयीसुविधांची माहिती घेत हाॅटेल्स, लाॅज,होम स्टेज (न्याहरी निवास)वगैरे मुलभूत गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला. ह्यासोबतच पाहुणचाराचे शिष्टाचार, अदब वगैरे अत्यावश्यक गोष्टींनाही स्थानिक युवावर्ग आत्मसात करु लागला. जिल्ह्यातील अर्थभिडस्त मालवणी माणुस आता सरकारच्या विविध योजनांद्वारे पर्यटनातून रोजगार निर्मितीच्या शक्यतांचाही सकारात्मक विचार करु लागला.
निव्वळ परदेशी पाहुणे आले तरच पर्यटन होते हा गैरसमज दूर होऊन देशांतर्गत पर्यटकांनाही आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना जोर धरुन लागला.
स्थळदर्शनासोबतच साहसी जलक्रिडा, ट्रेकींग, कॅम्पिंग आदींचाही पर्यटनाच्या प्रमुख पटलावर विस्तार होऊ लागला. छोट्या छोट्या सोयींसाठी व्यावसायिकांनी स्थानिक व्यापारी आणि तंत्रज्ञांचा पाठपुरावा करुन व्यापारातही पर्यटनाचे चलन खणखणीत कसे राहील हे दाखवून दिले.
तुरळक अपवाद वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणताच पर्यटन व्यवसाय हा अगदी छप्परफाड कमाई करु शकला नसला तरिही व्यावसायिकांनी तोट्यात जाऊन जीवाचे काही बरे वाईट केल्याच्याही नोंदी नक्कीच नाहीत.
या सर्व गोष्टींवरुन एक लक्षात येते की जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक आणि जिल्ह्यात येणारा पर्यटक हे दोघेही 'पर्यटन' या संकल्पनेकडे एका आस्थेने पहात आले आहेत.
शेजारील गोवा राज्यातील ऐकिव अनुचित प्रकार हे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायासाठी एक व्यावसायिक धडा ठरत आहेत.

आजचा युवा पर्यटक व पर्यटन व्यावसायिक हे दोघेही आजच्या पर्यटनाचा विचार करताना पर्यावरणाचे महत्व जाणत आहेत आणि आणखी जागृती करुन घेण्यासही उत्सुक आहेत. त्यासाठीच पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन ही संकल्पना आता सर्वांसाठी एक पर्यटन व्यवसाय अभ्यासक्रम असल्यासारखीच आहे.
लोकप्रतिनिधी, शासन,प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांमध्येच पर्यटनवाढीची आस्था वाढताना दिसत आहे.
बेकारी ही समस्या पर्यटनाद्वारा दूर होतेच शिवाय पर्यटनाचे सत्पात्र शिक्षण घेतल्यानंतर गावचा,शहराचा व एकूणच जिल्ह्याच्या मानसिकतेचा बौद्धीक विकास होतो हेही अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

पर्यटनाच्या आणखी विविध स्तरांचाही भविष्यात विचार केला जाईल अशी आशा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्यासाठी मैदाने व क्षेत्र उपलब्ध आहेत. त्याद्वारे क्रिडा पर्यटन ही संकल्पनाही भविष्यात राबवित येऊ शकते. त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांचा विविध खेळाच्या क्रिडा संघटनांशी संवाद होणे हा प्राथमिक टप्पा असेल.

जेवणखाण,सुखसोयी यासोबतच शाश्वत पर्यटनाच्या आस्थेची देवाण घेवाण करणे हा शाश्वत संकल्पच पर्यटन दिनाच्या दिवशी करुन त्याचा पाठपुरावा केला तरी जिल्ह्यातील तरुण आणि पर्यटन व्यवसाय सदैव हिरवागार राहील यात शंकाच नाही.

error: Content is protected !!