23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बांदा येथील बेपत्ता सदानंद कळंगुटकरांचा मृतदेह आढळला…!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : बांदा येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले सदानंद शिवराम कळंगुटकर (वय ६२, रा. बांदा -सटमटवाडी) यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. बांदा पोलिसात आकास्मिक मृत्युंची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदानंद शिवराम कळंगुटकर हे २५ पासून घरातून बेपत्ता होते. घरात कोणालाही न सांगता ते निघून गेले होते. याबाबतची खबर त्यांचा मुलगा शिवराम याने बांदा पोलिसात दिली होती. आज शोधाशोध करताना घराच्या मागील बाजूकडील जंगलात जंगली झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस निरीक्षक शामराव काळे, कर्मचारी ज्योती हरामलकर, प्रथमेश पवार, संजली पवार, प्रशांत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डोम जगदीश पाटील यांनी विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे आई, पती, २ मुलगे, भाऊ आसा परिवार आहे. अधीक तपास बांदा पोलीस करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : बांदा येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले सदानंद शिवराम कळंगुटकर (वय ६२, रा. बांदा -सटमटवाडी) यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. बांदा पोलिसात आकास्मिक मृत्युंची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदानंद शिवराम कळंगुटकर हे २५ पासून घरातून बेपत्ता होते. घरात कोणालाही न सांगता ते निघून गेले होते. याबाबतची खबर त्यांचा मुलगा शिवराम याने बांदा पोलिसात दिली होती. आज शोधाशोध करताना घराच्या मागील बाजूकडील जंगलात जंगली झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस निरीक्षक शामराव काळे, कर्मचारी ज्योती हरामलकर, प्रथमेश पवार, संजली पवार, प्रशांत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डोम जगदीश पाटील यांनी विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे आई, पती, २ मुलगे, भाऊ आसा परिवार आहे. अधीक तपास बांदा पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!