25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गणित विषयाचा बाप श्रीनिवास ‘रामानुजन’ किंवा ‘द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी.’ ( सिनेमा समिक्षण)

- Advertisement -
- Advertisement -

सिनेपट | समिक्षण : बायोपिक म्हणजे एखाद्याच्या जीवनावरील सिनेमा हा नेहमीच कोणतातरी संदेश घेऊन चालतो. गेल्या दिड दशकात भारतीय सिनेमाने पान सिंग तोमर, मिल्खा सिंग, मेरी काॅम, संजय दत्त , महेंद्र सिंग धोनी अशा अनेक मान्यवरांच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकून बायोपिकची निर्मिती केलेली आहे. मराठी मध्ये लोकमान्य टिळकांवरील बायोपिकची निर्मिती करण्यात आली. एकंदर ढोबळमानाने बायोपिकची निर्मिती ही समाजाभिमुख व्यक्ति, खेळाडू, अभिनेते, लोकनेते यांच्या जीवनावर जास्त प्रमाणात झाली हे ही खरे आहे.
याच दरम्यान २०१४ साली ‘कॅम्फर सिनेमा’ या सिनेमा निर्मिती कंपनीने इंग्लिश मध्ये ‘ द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी’ आणि तमिळ मध्ये ‘रामानुजन’ ह्या बायोपिकची निर्मिती केली. हिंदी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला.

शालेय जीवनात बर्याच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येणे हे आजपासून १०० वर्षांपूर्वी स्वाभाविक होते.
पण त्याच काळात भारतात एक असा बाल चमत्कार जन्माला आला होता की त्याने शाळेत असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवले आणि जगभर त्यांची प्रमेये आजही ‘मानावीच’ लागतात आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे गणिताचा बाप अर्थात् ‘श्रीनिवास रामानुजन.”
त्याच महान व्यक्तिमत्वा विषयी माहिती देणारा सिनेमा म्हणजे रामानुजन किंवा इंग्लिश मध्ये तोच सिनेमा ‘द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी’ नावाने उपलब्ध आहे.

सिनेमाची सुरवात तामिळनाडू मधील कुंभकोणम् गावातील एका शाळेतून होते जिथल्या तज्ञ गणित शिक्षकाला दोन आठवडे मेहनत करुनही शाळेच्या शिक्षकांचे व मुलांचे वार्षिक वेळापत्रक अचूक बनवता येत नाही. अशा वेळी ८ वीत शिकणारा एक श्रीनिवास रामानुजन नावाचा मुलगा ते वेळापत्रक केवळ १० मिनिटांत तंत्रशुद्धपणे मांडून देतो तेही एकाही चुकीशिवाय…!

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला एका ब्राम्हण परिवारात झालेला असतो. त्यांचा परिवार भारताच्या तामिळनाडूच्या कोइम्बतुर मधील इरोड गावात असतो. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर हे एका साड्यांच्या स्थानिक दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असतात.
श्रीनिवास रामानुजनची आई कोमल तम्मल ही एक गृहिणी असते पण पतीच्या संसाराला हातभार म्हणून शास्त्रीय गायनाच्या शिकवण्याही घेत असते . ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसाच रामानुजनला त्याच्या आईचा लळा असतो.
श्रीनिवास रामानुजनला जसे गणिताचे वरदान असते तसाच इतर विषयांबाबतीत मात्र त्याला शाप असतो. सुरुवाती पासून गणिताची आवड असल्याने बाकी इतर विषयांमध्ये रुची निर्माण होत नाही. शाळेत असताना त्यांच्या घरी काही पदवीची मुले भाडेकरू म्हणून राहत असतात आणि रामानुजन गणितात एवढे तरबेज असतो की ते आठवीत असतानाच तो पदवीच्या त्या मुलांना गणित शिकवतो . रामानुजन नावाच्या या गणितज्ञा मध्ये किती मोठी प्रतिभा लपलेली असते ते तिथले तरुण लगेच ओळखतात. घराच्या भाड्यासोबतच ते रामानुजनला क्लासची फी सुद्धा देतात.

रामानुजन यांना गणित आणि इंग्लिश या दोन विषयांची विशेष आवड असते. परंतु इंग्लिश भाषेकडे तो फक्त ‘गणित संशोधनाचे एक आंतरराष्ट्रीय साधन माध्यम’ म्हणून बघत असतो…त्याला इंग्लिशच्या कथा कल्पना, साहीत्य वगैरेत रुच़ी नसते. सुरुवातीला त्यांना त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे शिष्यवृत्ती मिळते. रामानुजन गणितामध्ये एवढे मग्न असतो की त्याला इतर विषयांकडे लक्षच देता येत नाही. परिणामी श्रीनिवास रामानुजन यामुळे १२ वी मध्ये तीनदा नापास होतो आणि त्याला मिळणारी शिष्यवृत्ती सुद्धा बंद होते.

यानंतर रामानुजनचे वडिल त्याच्यावर भयंकर संतापतात आणि गणिताच्या,अपाराच्या तथा अनंताच्या स्वप्नाळू दुनियेतून त्याला बाहेर पडायची आज्ञा देतात. अंकांशिवाय श्रीनिवास रामानुजन हा अक्षरशः घुसमटू लागतो. अंक हेच जागेपण आणि अंक हेच स्वप्न अशा संपूर्ण ‘गणित अंकित’ जीवनाचा पोटासाठीचा खडतर प्रवास सुरु होतो.

त्याच्या शिक्षणाचे दरवाजे बंद झालेले असतात. तो बेरोजगारही असतो.
त्याच्याकडे त्याच्या गणिता शिवाय कोणतीही गोष्ट नसते.
त्याला या कठीण काळात खूप काही सहन करावे लागते. त्यांनतर त्यांची तब्येत सुद्धा घसरते. याच दरम्यान १९०८ मध्ये त्याची आई त्याचे लग्न जानकी नावाच्या एका गोड मुलीशी लावून देते.
त्यानंतर त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडते.
आता श्रीनिवास रामानुजनला पती म्हणून जीवनात काम शोधणे अनिवार्य होते. तो मद्रास मध्ये जाऊन पुन्हा नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतो पण तो ज्या कोणाकडे जातो त्यांना त्याची गणिते,प्रमेये व त्रिकोणमिती समजू शकत नसते. त्याच्या गणितांना न समजता त्याला सगळेजण नाकारतात. पण खूप दिवसांच्या मेहनतीनंतर एक दिवस त्यांची भेट मद्रासचे उपजिल्हाधिकारी व्ही. रामास्वामी अय्यर यांच्याशी होते. ते गणितामध्ये पारंगत असतात.
जेव्हा ते रामानुजन यांनी सोडविलेली गणिते पाहतात तेव्हा ते ओळखतात की रामानुजन हा एक गणितातील चमत्कार आहे..! ते श्रीनिवास रामानुजनला २५ रुपये महिन्याच्या पगाराने कामावर रुजू करतात.

येथून रामानुजन यांचे संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण मिळते.
त्यानंतर आपल्या पगारातून रामानुजन पुन्हा आपल्या गणित संशोधनाची वाटचाल सुरु करतो.
त्याला रामचंद्र राव यांच्या ओळखीमुळे मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये एक अहवाल लिपिकाची नोकरी मिळते. काही दिवसांनतर गणित सूत्र प्राध्यापक सेशू अय्यर रामानुजनला केंब्रिज येथील प्रसिद्ध गणिताचे प्राध्यापक जीएच हार्डी यांना पत्र पाठवून त्याची प्रमेये व गणित संशोधन पत्राने पाठवायला सांगतात.
त्यानंतर रामानुजन त्याची सर्व प्रमेये एका पत्रात लिहून त्यांना पाठवतो आणि ती जी.एच हार्डी या गणित तज्ञाला एवढी भावतात की ते रामानुजनला लगेच त्यांच्याकडे इंग्लंडला यायचे निमंत्रण पाठवतात.
यानंतर श्रीनिवास रामानुजनची आई कमल मात्र रामानुजनला धार्मिक कारण आणि तब्येतीमुळे इंग्लंडला जाण्यापासून रोखते.

जग एका ‘गणिताच्या बापाला’ मुकते की पुढे काय होते ते पहाण्यासाठी हिंदी व तमिळ भाषेतील ‘रामानुजन’ किंवा इंग्लिश भाषेतील ‘द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी’ हा सिनेमा अवश्य पहावा. यु ट्यूब वर वरील तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा उपलब्ध आहे. इंग्लिश मध्ये द स्लम डाॅग मिलिनिअरचा अभिनेता देव पटेलने श्रीनिवास रामानुजन साकारला आहे.

कॅम्फर सिनेमाची निर्मिती असलेला हा सिनेमा ग्णन राजशेखरन यांनी दिग्दर्शित केला आहे. श्रीनिवास रामानुजनच्या भूमिकेतील अभिनेता ‘अभिनय वड्डी’ याला पहाणे ही एक खरेच अभिनयाची पर्वणीच आहे. त्याच्या आईच्या भूमिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासीनी मणिरत्नम् आणि पत्नी जानकीच्या भूमिकेतील अभिनेत्री भामा यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा या सिनेमातील अत्यावश्यक अभिनय सामग्री आहेत. ग्लॅमराईज्ड असे एक नांव म्हणजे अभिनेता ‘अब्बास’ हा सुद्धा एका छोटेखानी भूमिकेत दिसून येतो.( अब्बास म्हणजे ‘छुईमुईसी तुम लगती हो’ गाण्यातील प्रीती जांगियानीचा प्रियकर)
सनी जोसेफची सहज व निर्विघ्न सिनेमॅटोग्राफी ही सुद्धा या सिनेमाची जमेची बाजू आहे.
पटकथा पुढे सरकताना वेळोवेळी घेतलेला गणिते,प्रमेये व त्रिकोणमिती यांचा आधार या सिनेमाचा मूळ आत्मा खूप उत्तमपणे जपतो.

भारतीय गणित तज्ञ किंवा या अनंताच्या आश्चर्याचा हा ‘रामानुजन’ नावाचा बायोपिक खरेतर शक्य असेल तर प्रत्येक शाळेत दाखवला जावा किंवा शालेय मुलांच्या पालकांनी आपल्या मुला मुलींना अवश्य दाखवावा जेणेकरुन ‘गणिताचा बाप अर्थात् श्रीनिवास रामानुजन’ पुढच्या पिढ्यांपर्यंत सहजपणे पोहोचेल.

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिनेपट | समिक्षण : बायोपिक म्हणजे एखाद्याच्या जीवनावरील सिनेमा हा नेहमीच कोणतातरी संदेश घेऊन चालतो. गेल्या दिड दशकात भारतीय सिनेमाने पान सिंग तोमर, मिल्खा सिंग, मेरी काॅम, संजय दत्त , महेंद्र सिंग धोनी अशा अनेक मान्यवरांच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकून बायोपिकची निर्मिती केलेली आहे. मराठी मध्ये लोकमान्य टिळकांवरील बायोपिकची निर्मिती करण्यात आली. एकंदर ढोबळमानाने बायोपिकची निर्मिती ही समाजाभिमुख व्यक्ति, खेळाडू, अभिनेते, लोकनेते यांच्या जीवनावर जास्त प्रमाणात झाली हे ही खरे आहे.
याच दरम्यान २०१४ साली 'कॅम्फर सिनेमा' या सिनेमा निर्मिती कंपनीने इंग्लिश मध्ये ' द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी' आणि तमिळ मध्ये 'रामानुजन' ह्या बायोपिकची निर्मिती केली. हिंदी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला.

शालेय जीवनात बर्याच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येणे हे आजपासून १०० वर्षांपूर्वी स्वाभाविक होते.
पण त्याच काळात भारतात एक असा बाल चमत्कार जन्माला आला होता की त्याने शाळेत असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवले आणि जगभर त्यांची प्रमेये आजही 'मानावीच' लागतात आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे गणिताचा बाप अर्थात् 'श्रीनिवास रामानुजन."
त्याच महान व्यक्तिमत्वा विषयी माहिती देणारा सिनेमा म्हणजे रामानुजन किंवा इंग्लिश मध्ये तोच सिनेमा 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी' नावाने उपलब्ध आहे.

सिनेमाची सुरवात तामिळनाडू मधील कुंभकोणम् गावातील एका शाळेतून होते जिथल्या तज्ञ गणित शिक्षकाला दोन आठवडे मेहनत करुनही शाळेच्या शिक्षकांचे व मुलांचे वार्षिक वेळापत्रक अचूक बनवता येत नाही. अशा वेळी ८ वीत शिकणारा एक श्रीनिवास रामानुजन नावाचा मुलगा ते वेळापत्रक केवळ १० मिनिटांत तंत्रशुद्धपणे मांडून देतो तेही एकाही चुकीशिवाय…!

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला एका ब्राम्हण परिवारात झालेला असतो. त्यांचा परिवार भारताच्या तामिळनाडूच्या कोइम्बतुर मधील इरोड गावात असतो. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर हे एका साड्यांच्या स्थानिक दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असतात.
श्रीनिवास रामानुजनची आई कोमल तम्मल ही एक गृहिणी असते पण पतीच्या संसाराला हातभार म्हणून शास्त्रीय गायनाच्या शिकवण्याही घेत असते . ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसाच रामानुजनला त्याच्या आईचा लळा असतो.
श्रीनिवास रामानुजनला जसे गणिताचे वरदान असते तसाच इतर विषयांबाबतीत मात्र त्याला शाप असतो. सुरुवाती पासून गणिताची आवड असल्याने बाकी इतर विषयांमध्ये रुची निर्माण होत नाही. शाळेत असताना त्यांच्या घरी काही पदवीची मुले भाडेकरू म्हणून राहत असतात आणि रामानुजन गणितात एवढे तरबेज असतो की ते आठवीत असतानाच तो पदवीच्या त्या मुलांना गणित शिकवतो . रामानुजन नावाच्या या गणितज्ञा मध्ये किती मोठी प्रतिभा लपलेली असते ते तिथले तरुण लगेच ओळखतात. घराच्या भाड्यासोबतच ते रामानुजनला क्लासची फी सुद्धा देतात.

रामानुजन यांना गणित आणि इंग्लिश या दोन विषयांची विशेष आवड असते. परंतु इंग्लिश भाषेकडे तो फक्त 'गणित संशोधनाचे एक आंतरराष्ट्रीय साधन माध्यम' म्हणून बघत असतो…त्याला इंग्लिशच्या कथा कल्पना, साहीत्य वगैरेत रुच़ी नसते. सुरुवातीला त्यांना त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे शिष्यवृत्ती मिळते. रामानुजन गणितामध्ये एवढे मग्न असतो की त्याला इतर विषयांकडे लक्षच देता येत नाही. परिणामी श्रीनिवास रामानुजन यामुळे १२ वी मध्ये तीनदा नापास होतो आणि त्याला मिळणारी शिष्यवृत्ती सुद्धा बंद होते.

यानंतर रामानुजनचे वडिल त्याच्यावर भयंकर संतापतात आणि गणिताच्या,अपाराच्या तथा अनंताच्या स्वप्नाळू दुनियेतून त्याला बाहेर पडायची आज्ञा देतात. अंकांशिवाय श्रीनिवास रामानुजन हा अक्षरशः घुसमटू लागतो. अंक हेच जागेपण आणि अंक हेच स्वप्न अशा संपूर्ण 'गणित अंकित' जीवनाचा पोटासाठीचा खडतर प्रवास सुरु होतो.

त्याच्या शिक्षणाचे दरवाजे बंद झालेले असतात. तो बेरोजगारही असतो.
त्याच्याकडे त्याच्या गणिता शिवाय कोणतीही गोष्ट नसते.
त्याला या कठीण काळात खूप काही सहन करावे लागते. त्यांनतर त्यांची तब्येत सुद्धा घसरते. याच दरम्यान १९०८ मध्ये त्याची आई त्याचे लग्न जानकी नावाच्या एका गोड मुलीशी लावून देते.
त्यानंतर त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडते.
आता श्रीनिवास रामानुजनला पती म्हणून जीवनात काम शोधणे अनिवार्य होते. तो मद्रास मध्ये जाऊन पुन्हा नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतो पण तो ज्या कोणाकडे जातो त्यांना त्याची गणिते,प्रमेये व त्रिकोणमिती समजू शकत नसते. त्याच्या गणितांना न समजता त्याला सगळेजण नाकारतात. पण खूप दिवसांच्या मेहनतीनंतर एक दिवस त्यांची भेट मद्रासचे उपजिल्हाधिकारी व्ही. रामास्वामी अय्यर यांच्याशी होते. ते गणितामध्ये पारंगत असतात.
जेव्हा ते रामानुजन यांनी सोडविलेली गणिते पाहतात तेव्हा ते ओळखतात की रामानुजन हा एक गणितातील चमत्कार आहे..! ते श्रीनिवास रामानुजनला २५ रुपये महिन्याच्या पगाराने कामावर रुजू करतात.

येथून रामानुजन यांचे संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण मिळते.
त्यानंतर आपल्या पगारातून रामानुजन पुन्हा आपल्या गणित संशोधनाची वाटचाल सुरु करतो.
त्याला रामचंद्र राव यांच्या ओळखीमुळे मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये एक अहवाल लिपिकाची नोकरी मिळते. काही दिवसांनतर गणित सूत्र प्राध्यापक सेशू अय्यर रामानुजनला केंब्रिज येथील प्रसिद्ध गणिताचे प्राध्यापक जीएच हार्डी यांना पत्र पाठवून त्याची प्रमेये व गणित संशोधन पत्राने पाठवायला सांगतात.
त्यानंतर रामानुजन त्याची सर्व प्रमेये एका पत्रात लिहून त्यांना पाठवतो आणि ती जी.एच हार्डी या गणित तज्ञाला एवढी भावतात की ते रामानुजनला लगेच त्यांच्याकडे इंग्लंडला यायचे निमंत्रण पाठवतात.
यानंतर श्रीनिवास रामानुजनची आई कमल मात्र रामानुजनला धार्मिक कारण आणि तब्येतीमुळे इंग्लंडला जाण्यापासून रोखते.

जग एका 'गणिताच्या बापाला' मुकते की पुढे काय होते ते पहाण्यासाठी हिंदी व तमिळ भाषेतील 'रामानुजन' किंवा इंग्लिश भाषेतील 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी' हा सिनेमा अवश्य पहावा. यु ट्यूब वर वरील तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा उपलब्ध आहे. इंग्लिश मध्ये द स्लम डाॅग मिलिनिअरचा अभिनेता देव पटेलने श्रीनिवास रामानुजन साकारला आहे.

कॅम्फर सिनेमाची निर्मिती असलेला हा सिनेमा ग्णन राजशेखरन यांनी दिग्दर्शित केला आहे. श्रीनिवास रामानुजनच्या भूमिकेतील अभिनेता 'अभिनय वड्डी' याला पहाणे ही एक खरेच अभिनयाची पर्वणीच आहे. त्याच्या आईच्या भूमिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासीनी मणिरत्नम् आणि पत्नी जानकीच्या भूमिकेतील अभिनेत्री भामा यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा या सिनेमातील अत्यावश्यक अभिनय सामग्री आहेत. ग्लॅमराईज्ड असे एक नांव म्हणजे अभिनेता 'अब्बास' हा सुद्धा एका छोटेखानी भूमिकेत दिसून येतो.( अब्बास म्हणजे 'छुईमुईसी तुम लगती हो' गाण्यातील प्रीती जांगियानीचा प्रियकर)
सनी जोसेफची सहज व निर्विघ्न सिनेमॅटोग्राफी ही सुद्धा या सिनेमाची जमेची बाजू आहे.
पटकथा पुढे सरकताना वेळोवेळी घेतलेला गणिते,प्रमेये व त्रिकोणमिती यांचा आधार या सिनेमाचा मूळ आत्मा खूप उत्तमपणे जपतो.

भारतीय गणित तज्ञ किंवा या अनंताच्या आश्चर्याचा हा 'रामानुजन' नावाचा बायोपिक खरेतर शक्य असेल तर प्रत्येक शाळेत दाखवला जावा किंवा शालेय मुलांच्या पालकांनी आपल्या मुला मुलींना अवश्य दाखवावा जेणेकरुन 'गणिताचा बाप अर्थात् श्रीनिवास रामानुजन' पुढच्या पिढ्यांपर्यंत सहजपणे पोहोचेल.

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल.

error: Content is protected !!