मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद परीसर लवकरच कात टाकणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.
नगरपालिका इमारत सुशोभीकरणाचे ५६ लाख रुपयाचे काम २०१९/२० मध्ये वैशिष्ठपुर्ण योजनेतून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी यांच्या कालावधीत करण्यात आले त्यामुळे नगरपरिषद इमारतीला एक सौंदर्य प्राप्त झाले .त्यानंतर मालवण नगरपरिषद इमारत परिसर सुशोभीत करून इमारतीच सौंदर्य अजून वाढविण्याच्या दृष्टीने २०२०/२०२१ मध्ये जिल्हास्तरीय नग्रोथान योजनेतून ७४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.
त्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर २३ मार्च २०२१ला रोजी कामाचे आदेश देण्यात आले आणि आता ते काम अंतिम टप्प्यात आले असून या कामात इमारतीच्या दर्शनी भागात पेव्हर ब्लॉक बसविणे, मालवण नप च्या गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था, नप मध्ये कामासाठी येणाऱ्यांच्या गाड्यासाठी पार्किंग, अग्निशमन गाडी साठी स्वतंत्र रोड अशा सोयी तयार करण्यात येणार आहेत.
नप च्या दर्शनी भागात फाऊंटन ( कारंजा) बसवण्यात येणार आहे त्यामुळे नगरपरिषद परिसर सौंदर्यात आणखीन भर पडणार असल्याचे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या दर्शनी भागात लँड्स्केपिंग करण्यात येऊन त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. झाडांचे बुंधे,आकर्षक असे प्रवेशद्वार करून प्रवेशद्वारावरच वॉचमॅन केबिन करण्यात आली आहे. अश्या प्रकारे नप इमारतीबरोबरच इमारतीच्या सभोवतालचा परिसरही आणि काही दिवसात सुशोभित होऊन मालवण नप ला एक नवीन सौंदर्य प्राप्त होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले.
आपल्या व सहकार्यांच्या सत्ता कालावधीतच हे काम पूर्णत्वास येणार होते पण कोविड कालावधी, लाईट शिफ्टिंग इत्यादी अडथळे आल्याने हे काम होऊ शकले नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सुशोभीत असा मालवण नगरपरिषद परीसर कात टाकल्यानंतर मालवणच्या एकूण सौंदर्यातच भर टाकणार असून त्यासाठी जनतेचा विश्वास सार्थ ठरवून आपण व सहकार्यांनी प्रयत्न केल्याचा आपल्याला आनंद असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले.