25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आता आदिवासी गरजू महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागेल ; २४ महिलांना शिलाई मशीनचे वितरण.

- Advertisement -
- Advertisement -

आय. एस. एस कंपनीच्या मानव संसाधन व्यवस्थापक श्वेता लाजरुस यांचे गौरवोद्गार..!

बांदा | राकेश परब :कोकण संस्थेचे रोजगार निर्मिती स्कुलच्या माध्यमातून २४ महिलांना शिलाई मशीन आणि सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.

इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीतील महिलांना आज मोफत शिलाई मशीन आणि सर्टिफिकेट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिलाई स्कुलच्या माध्यमातून ५० महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देण्याचे काम संस्थेने हातात घेतले असून आज त्यातील २४ महिलांना मोफत मशीन आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले

या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिलाई काम, शिकवणे आणि मशीन दुरुस्तीचे ३ महिने प्रशिक्षण दिले असून रोजगार निर्मिती प्रशिक्षण, साधन आणि पुढील १ वर्ष व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले आहे.

काल वाशिंद येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली, त्यानंतर महिलांनी स्वागत गीत, पोवाडा गीत आणि आदिवासी महिलांनी तारपा हा पारंपरिक नृत्याविष्कार सादर केला. कोकण संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

आय एस एस कंपनीचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी श्री. प्रतीक पाटील, श्री.नौशाद शेख, श्वेता लॅझोरस यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आणि मदतीचे आश्वासन दिले. या स्कुलच्या माध्यमातून २४ महिलांना रोजगार प्रशिक्षण आणि शिलाई मशीन देऊन महिलांना स्वतःच्या गावात व्यवसाय निर्मितीचे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल वाशिंद गावाचे ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत वीरकर यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. शिलाई स्कुलच्या लाभार्थी सविता भालेराव, सपना भोईर, रजनी निकम आणि शारदा भोईर यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना खेडेगावातील महिलांना या स्कुलचा कसा फायदा होईल आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा मिटला याबद्दल सांगितले तसेच संस्थेने दिलेल्या संधीचे सोने करून दाखवू असे आश्वासन आणि कंपनीचे आभार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर वाशिंद गावच्या सरपंच लता शिंगवे, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत वीरकर, प्रतीक पाटील, नौशाद शेख, श्वेता लॅझोरस, ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला शिक्षिका स्नेहल मोरे, रामचंद्र पाटील, साक्षी पोटे, नाव्या पाटील, सागर केवारी, मंगेश पाटील आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी तर प्रोजेक्ट मॅनेजर प्रीती पांगे यांनी सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!