विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालडी गांवचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यावर्षीही श्री. हरीनाम सप्ताह २० व २१ नोव्हेंबर रोजी सात्विक उत्साहात तथा भक्तिमय वातवरणात संपन्न झाला.
या श्री.हरीनाम सप्ताहाला मोठ्या संख्येने माहेरवाशिणी,ग्रामस्थ ,भाविक यांची उपस्थित होते.
यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच हरीनाम सप्ताहाची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
हरिनाम सप्ताहाची सुरुवात २० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता झाली.
यावेळी देवीची पूजा अभिषेक करून सारे विधी झाल्यावर देवीला मुकुट, साडी व दागिने घालून सजवली जाते.सकाळी मंत्रघोषात हरीनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती म्हणून सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सुरू झाला.
श्री.हरीनाम सप्ताह सुरु झाल्यावर देवींची खणानारळानी ओटी भरण्यासाठी सुहासिनीची रांग लागते. अनेकजण नवस फेडण्यासाठी येतात. या वर्षी जवळपास 15 भजनमंडळानी आपापले नृत्यविष्कार सुश्राव्य अभंगा वर व पेटीच्या तालावर आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्या वर सादर केले . सप्ताहाच्या
पहिल्या रात्री भाविकांसाठी तसेच भजन कला मंडळातील सदस्यांना जेवणाची उत्कृष्ट सोय केली होती त्याचा लाभ सर्वानी घेतला. मध्यरात्री १२ वाजता दिंडी काढली जाते व त्यामध्ये सामील होणे हे एक पुण्य समजले जाते आणि पाहणे सुद्धा महत्वाचे ठरते.
२१ तारखेला सकाळी ६ वाजता काकड आरती झाली. त्यानंतर १० वाजेपर्यंत गावातील लोकांनी ठेका धरला.१० वाजता ब्राह्मणांनी उत्तर पूजा करून सप्ताह समाप्ती केली.
त्यानंतर देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घालून महाआरती केली आणि महाप्रसाद दिला गेला त्यात खीर ही महत्वाचे आकर्षण असते.ग्रामस्थ आणि आलेल्या सर्व भाविकानी
महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद होऊन हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.
हा सप्ताहची रंगत अतिशय रंजक होती. तो यशस्वी बनविण्यात स्थनिक ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली त्यास मुंबई स्थित ग्रामस्थांची योग्य साथ मिळाली. सर्व ग्रामस्थांचा सहभाग प्रशंसनीय होता.