शिरगांव | संतोष साळसकर :
कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराला भेट द्यावी व ज्या पध्दतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वर “ श्री ” च्या प्रथम महापूजाचा मान स्विकारावा अशी आम्हां कोकण वासीयांची मनोमन इच्छा व्यक्त करत पर्यटन विकासाकरिता जास्तीत जास्त निधीची तरतुद करावी अशी मागणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
१८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या “महाशिवरात्री” यात्रे निमित्त “श्री” च्या प्रथम महापूजेसाठी आमंत्रण पत्र देखील देण्यात आले दी. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ १२.०० वा. नंतर दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्रौ ठिक ०१.०० वा. “श्री” ची प्रथम पुजा परंपरेनुसार केली जाणार आहे. कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराला भेट द्यावी व ज्या पध्दतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वर “ श्री ” च्या प्रथम महापूजाचा मान स्विकारावा अशी आम्हां कोकण वासीयांची मनोमन इच्छा आणि कळकळीची विनंती यावेळी करण्यात आली व पर्यटन विकासाकरिता जास्तीत जास्त निधीची तरतुद करावी असे आवाहन करण्यात आले.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सदस्य व पदाधिकारी व कुणकेश्वर ग्रामपंचयत सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली भेटीच्यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे , कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार अभय पेडणेकर, विश्वस्त विजय वाळके,सचिव शरद वाळके,सदस्य संजय आचरेकर, सदस्य संतोष लाड, उपस्थित होते. मुख्यमंत्री कुणकेश्वर यांना मंदिराची प्रतिमा व कोकणी मेवा भेट म्हणून देत त्यांना पुढील वाटचाली साठी देवस्थान विश्वस्त, ग्रामपंचायत , मानकरी देवसेवक व समस्थ ग्रामस्थां मार्फत हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष यांचे देखील भेट घेऊन कुणकेश्वर पर्यटन वाढीसाठी व आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याची मागणी देखील विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली.