कुडाळ भाजयुमोचा निर्धार – रुपेश कानडे यांनी दिली माहिती
विवेक परब / आचरा : असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने “इ श्रम कार्ड” योजनेचा नुकताच शुभारंभ केला आहे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. केंद्र सरकार कामगारांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.वसरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. या धोरणाचा फायदा भविष्यात ह्याच कामगारांना होईल असे आज कुडाळ भाजपा कार्यालयात आयोजित बैठकीत भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रुपेश कानडे यांनी माहिती दिली.
हे केंद्र सरकारचे ई श्रम कार्ड तयार करून घेतल्यास असंघटित कामगारांना केंद्र सरकारच्या वतीने 2 लाख रुपयांचा विमा मोफत दिला जाईल. या असंघटित कामगाराना भविष्यात अनेक योजना व संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार तयार आहे. ही योजना भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून सर्व असंघटित कामगारांपर्यंत पोहोचवली जाईल, असे रुपेश कानडे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यावेळी उपस्थित कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ.संध्या तेरसे,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अविनाश पराडकर, युवा मोर्चा ता. अध्यक्ष रुपेश कानडे,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,तालुका सरचिटणीस विजय कांबळी,भाई बेळेनेकर,युवा मोर्चा ता चिटणीस रुपेश भाई बिडये,कुडाळ महिला शहराध्यक्ष ममता धुरी,बाव सरपंच नागेश परब,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तन्मय वालावकर,देविदास नाईक, आदी भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते