मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूल नं.२ देऊळवाडाची विद्यार्थिनी कुमारी नेहा राजेश चिंदरकर हिला राज्यस्तरीय कविता स्पर्धेत शालेय माध्यमिक गटात “कोकणातल्या पावसातील निसर्ग” या कवितेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. ठाणे येथील व्यास-क्रिएशन(प्रकाशन) आणि राज्ञी- उमन वेलफेअर असोसिएशन यांच्या विद्यमाने सदर स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र आणि रोख २,२२२ रुपये आयोजकांच्या कडून देण्यात आले. ठाणे येथील व्यास क्रिएशन(प्रकाशन) राज्ञी उमन वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने प्रथमच या वर्षी कलावंतांच्या कलेला उत्तम संधी मिळावी यासाठी निबंध, घोषवाक्य, चित्रकला,आणि कविता अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी राज्यातून १३५७ स्पर्धकांचा सहभाग होता.
कुमारी नेहा चिंदरकर हिच्या या यशाबद्दल मसुरे एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, जे.डी. बागवे, स्थानिक कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाकम, सरोज परब, प्रभारी मुख्याध्यापक एस आर कांबळे, शिक्षिका अर्चना कोदे, आरती मसुरेकर, श्री हळवे, कमिटीचे कार्यकर्ते, प्रशांत परब, प्रकाश राणे, सोनोपंत बागवे, नरेंद्र सावंत सर्व सभासद आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. नेहा हिला शिक्षिका अर्चना कोदे यांचे मार्गदर्शन लाभले. नेहा चिंदरकर हिच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.