बांदा | राकेश परब :
बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्या वार्षिक पदयात्रांचा शुभारंभ झाला असून मंगळवारी बांदा ते माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.दरवर्षी बांदावासियांची पहिली पदयात्रा श्रीक्षेत्र माणगावला होते.बांदा ते माणगाव पायी चालत जाऊऩ श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज संस्थापित श्री दत्तमंदिराचे दर्शन घेण्यात येते. यंदा पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला.ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.
पहाटेच्या वेळी श्री देव बांदेश्वर भुमिका दर्शन घेऊन पदयात्रींनी प्रस्थान केले. दुपारी ही पदयात्रा माणगावला पोहोचली.दर्शन घेऊन सर्वांनी माध्यान्ह आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला.बांदा येथिल अऩ्य अनेक भाविकही यावेळी माणगांवला आले होते. सामुहीक नामस्मरण करण्यात आले त्यानंतर पदयात्रेचे सदस्य बांदा येथे परत आले.
यापुढील दाणोली पदयात्रेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अध्यक्ष उमेश मयेकर यांनी सांगितले.