संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सुमारे २० संघांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर क्रीडा अधिकारी मनिषा पाटील व खेळाडू प्रतिनीधींच्या हस्ते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये,शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, कुणकेश्वर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे,इळयेचे धर्मराज धुरत,श्री.खाकर श्री. मयेकर,श्रीम.माधुरी खराडे,अनिकेत वेतुरेकर,श्री.पवार,श्री.मेस्त्री,कासार्डे विद्यालयातील शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य खाड्ये यांनी केले तर याप्रसंगी श्री. प्रभाकर कुडतरकर,मनिषा पाटील, प्राचार्य एम.डी.खाड्ये, बाळासाहेब ढेरे,धर्मराज धुरत , दत्तात्रय मारकड, आदींनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पहिल्या दिवशी अतिशय प्रेक्षणीय असे सामने क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले.
दुसऱ्या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडूना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानले.