24.2 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

कासार्डे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘ व्यक्तिमत्व विकास ‘ शिबिर संपन्न..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. संघाचे विचार समाजात दृढ करण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत संघाच्या व्यक्तिमत्व शिबीर (प्राथमिक वर्गासाठी) ठरवला जातो. पूर्वी असा वर्ग नागपूर, मुंबई, पुणे मोठ्या शहरात होत असे. यावर्षी हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व विकास शिबिर प्रथमच कासार्डे येथे संपन्न झाला. 
संघ हा प्रसिद्धी पासून लांब राहत असल्यानेच एवढे दिवस टिकला व संघाचे कार्य अविरत सुरू आहे अशी संघमंडळीची धारणा आहे. तरीही संघाचे विचार व कार्य विस्तार वाढविण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात असा वर्ग होऊ लागला आहे.
गेल्या वर्षी बांदा – पानवळ येथे असा वर्ग झाला होता. यावेळी तो २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे संपन्न झाला. संपूर्ण जिल्ह्यातून अनेक प्रशिक्षणार्थ्यानी या  वर्गात सहभाग घेतला. या वर्गात दिनचर्येचे कडक पालन केले जाते. लवकर उठून  प्रार्थना,ध्वजारोहण,  शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, बुद्धीच्यातुर्याचे विविध खेळ घेतले जातात, भारत मातेची प्रार्थना , ध्वजावतरण करून दोन तासांच्या शारीरिक सत्राची सांगता होते.
यानंतर शरीरशुद्धी, स्वच्छता व  न्याहरी झाल्यानंतर बौद्धिक व्याख्याने, स्वाध्याय, मंत्र, देशभक्तीपर गीतपठण सरावाचे सत्र असते, दुपारी भोजनानंतर विश्रांती घेतली जाते. दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा बौद्धिक व्याख्यान, स्वाध्याय व सराव घेतला जातो. सायंकाळी पुन्हा ध्वजारोहण, दोन तासाचा शारीरिक व्यायाम व खेळ, भारत मातेची प्रार्थना,ध्वजावतरण, रात्री जेवणानंतर प्रार्थना व विश्रांती असा नियमित दिनक्रम असतो
या वर्गात प्रशिक्षणार्थ्यांना शरीरसौष्ठवासोबत, कडक स्वयंशिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन, देशभक्ती, समर्पण भाव, मानवता धर्म, भारतीय संस्कृती, विज्ञान ,इतिहास, पर्यावरण रक्षण, जागतिक घडामोडी इत्यादी गोष्टींचे समग्र ज्ञान दिले जाते.
या वर्गाच्या निमित्ताने कासार्डे हायस्कूल येथे पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित,व्यक्तीं व बुद्धिजीवींना, संघाच्या वतीने संवादासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संघाची कार्यपद्धती, संघाचे विविध आयाम, देशभरात सुरू असलेली सेवा कार्ये, संघ कार्याची आज समाजाला असलेली गरज याबाबत माहिती दिली. यामध्ये दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, बबन नारकर, शांताराम तावडे, कल्पेश पाटील, उदय दूधवडकर, रवींद्र पाताडे , परशुराम झगडे यांनी चर्चेत भाग घेतला.
हा वर्ग यशस्वी होण्यासाठी अनेक स्वयंसेवक पूर्णवेळ अहोरात्र राबत होते. प्रशिक्षणार्थ्यांची न्याहारी, भोजन, स्वच्छता, विश्रांती याबाबत कटाक्षाने काळजी घेतली जात होती.वर्गाच्या अंतिम टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी रात्री विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रशिक्षणार्थ्यानी भजन, गायन, अभिनयाद्वारे आपापले कलागुण सादर केले. ध्वजारोहण, शारीरिक व्यायाम, बौद्धिक खेळ, भारत मातेची प्रार्थना व ध्वजावतरण करून या प्राथमिक वर्गाची सांगता करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. संघाचे विचार समाजात दृढ करण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत संघाच्या व्यक्तिमत्व शिबीर (प्राथमिक वर्गासाठी) ठरवला जातो. पूर्वी असा वर्ग नागपूर, मुंबई, पुणे मोठ्या शहरात होत असे. यावर्षी हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व विकास शिबिर प्रथमच कासार्डे येथे संपन्न झाला. 
संघ हा प्रसिद्धी पासून लांब राहत असल्यानेच एवढे दिवस टिकला व संघाचे कार्य अविरत सुरू आहे अशी संघमंडळीची धारणा आहे. तरीही संघाचे विचार व कार्य विस्तार वाढविण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात असा वर्ग होऊ लागला आहे.
गेल्या वर्षी बांदा - पानवळ येथे असा वर्ग झाला होता. यावेळी तो २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे संपन्न झाला. संपूर्ण जिल्ह्यातून अनेक प्रशिक्षणार्थ्यानी या  वर्गात सहभाग घेतला. या वर्गात दिनचर्येचे कडक पालन केले जाते. लवकर उठून  प्रार्थना,ध्वजारोहण,  शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, बुद्धीच्यातुर्याचे विविध खेळ घेतले जातात, भारत मातेची प्रार्थना , ध्वजावतरण करून दोन तासांच्या शारीरिक सत्राची सांगता होते.
यानंतर शरीरशुद्धी, स्वच्छता व  न्याहरी झाल्यानंतर बौद्धिक व्याख्याने, स्वाध्याय, मंत्र, देशभक्तीपर गीतपठण सरावाचे सत्र असते, दुपारी भोजनानंतर विश्रांती घेतली जाते. दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा बौद्धिक व्याख्यान, स्वाध्याय व सराव घेतला जातो. सायंकाळी पुन्हा ध्वजारोहण, दोन तासाचा शारीरिक व्यायाम व खेळ, भारत मातेची प्रार्थना,ध्वजावतरण, रात्री जेवणानंतर प्रार्थना व विश्रांती असा नियमित दिनक्रम असतो
या वर्गात प्रशिक्षणार्थ्यांना शरीरसौष्ठवासोबत, कडक स्वयंशिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन, देशभक्ती, समर्पण भाव, मानवता धर्म, भारतीय संस्कृती, विज्ञान ,इतिहास, पर्यावरण रक्षण, जागतिक घडामोडी इत्यादी गोष्टींचे समग्र ज्ञान दिले जाते.
या वर्गाच्या निमित्ताने कासार्डे हायस्कूल येथे पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित,व्यक्तीं व बुद्धिजीवींना, संघाच्या वतीने संवादासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संघाची कार्यपद्धती, संघाचे विविध आयाम, देशभरात सुरू असलेली सेवा कार्ये, संघ कार्याची आज समाजाला असलेली गरज याबाबत माहिती दिली. यामध्ये दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, बबन नारकर, शांताराम तावडे, कल्पेश पाटील, उदय दूधवडकर, रवींद्र पाताडे , परशुराम झगडे यांनी चर्चेत भाग घेतला.
हा वर्ग यशस्वी होण्यासाठी अनेक स्वयंसेवक पूर्णवेळ अहोरात्र राबत होते. प्रशिक्षणार्थ्यांची न्याहारी, भोजन, स्वच्छता, विश्रांती याबाबत कटाक्षाने काळजी घेतली जात होती.वर्गाच्या अंतिम टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी रात्री विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रशिक्षणार्थ्यानी भजन, गायन, अभिनयाद्वारे आपापले कलागुण सादर केले. ध्वजारोहण, शारीरिक व्यायाम, बौद्धिक खेळ, भारत मातेची प्रार्थना व ध्वजावतरण करून या प्राथमिक वर्गाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!