विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (सिंधुदुर्ग मंडल) उपविभाग-आचरा आयोजित तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग व व्यापारी संघटना आचरा यांच्या सहकार्याने प्रथमच मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी ‘लौकिक सांस्कृतिक भवन’ (हाँटेल सीराँक शेजारी) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी आचरा येथे प्रथमच “विज ग्राहक मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात वीज बिला बाबत तक्रारी, बंद असलेले पथदिप, वाढिव विज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणच्या विविध योजना या आणि अशा अनेक तक्रारींचा तात्काळ निकाल करण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी ग्राहकांनी आपल्या मनातील शंका-कुशंका, गैरसमज, तक्रारी मांडाव्यात व सर्वांनी मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन वामन आचरेकर-अध्यक्ष व्यापारी संघटना आचरा, नितीन वाळके-सचिव सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना व प्रसाद पारकर-अध्यक्ष सिंधुदुर्ग व्यापारी संघटना यांनी केले आहे.