23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिनेपट

- Advertisement -
- Advertisement -

उंच आपला सिनेमा (साप्ताहिक सदर)

मुक्काम पोस्ट लंडन

एखाद्या बिग बजेट मराठी सिनेमाची पटकथा केवळ तीन प्रमुख व्यक्तिरेखांना पडद्यावर ठेवून दाखवायचे धाडस कदाचित फक्त दिग्दर्शक केदार शिंदेच करु शकले असावेत. आजच्या दिवसांत ते कदाचित नवल वाटलं नसतं परंतु 1 जानेवारी 2007 साली प्रदर्शित झालेल्या मुक्काम पोस्ट लंडन या सिनेमाच्याबाबतीत ते धाडसच म्हणावे लागेल.

वैजनाथ ऊर्फ वैजा ओंकार हंपरवार हा सातार्यानजिकच्या एका खेड्यातल्या बापवेगळा तरुण. अस्सल गावरानपणा जपूनही कला शाखेचा पदवीधर असलेल्या वैजाची आई ही काळाच्याही पुढे राहून वैजाला वाढवलेली धोरणी बाई म्हणून तिचा वेगळाच सन्मान वैजाला कायम वाटत होता. वैजाच्या आईच्या द्रष्टेपणाने गावातल्या इतरांना व शैक्षणिक कार्यालाही खूप मदत झाली होती म्हणून वैजाच्या आईच्या निधनानंतर गावच्या शाळेला त्याच्या आईचे नांव आणि वैजाला शाळेमध्ये अध्यापकाची संधी असे दोन भावनिक योग जुळून येतात.
आईचे सर्व विधी आटोपल्यानंतर वैजा आईच्या आठवणीने आईची ट्रंक उघडतो.
इथे भरत जाधवचा वैजा पाहून अक्षरशः प्रत्येक मुलाला आईची आठवण आणल्यावाचून रहाणार नाही असा अभिनय भरतने केलाय…!
ती ट्रंक उघडताच खरा सिनेमा सुरु होतो. ट्रंकमध्ये एक छोटी पेटी असते जिच्यामध्ये स्कॉटलंड बॅन्केचे चार कोटीचे बेअरर चेक्स आणि सोबत लंडनची विमानाची दिडशे तिकिटे असतात. हे सर्व पाहून चक्रावून गेलेल्या वैजाला धक्काच बसतो. जीवनभर अतिशय साध्या व काटकसरीत जगत आलेले त्याचे बालपण ते चेक्स व एकूणच सर्व पाहून बुचकळ्यात पडते.
चौकशीअंती त्याला कळते की तो बापावेगळा जरी असला तरिही त्याचे वडिल म्हणजे ओंकार हंपरवार हे जिवंत आहेत आणि ते लंडनमधील विंडसर येथील एक खूप मोठे उद्योजक आहेत.
जीवनभर काटकसरीत जगलेल्या वैजाला वडिलांचा प्रचंड संताप येतो आणि तो त्यांच्या भेटीला लंडनला जायचे ठरवतो. वडिलांचा फोन नंबर शोधून तो त्यावर फोन करुन त्याच्या लंडनला येण्याची वादळी सूचनाही देतो. तो फोन प्रत्यक्ष त्याचे वडिलच उचलतात परंतु ते त्याच्या शब्दांना सामोरे जाऊ शकत नाहीत म्हणून कोणीतरी कर्मचारी बोलतायत असे खोटे सांगतात.

वैजा म्हणजे भरत जाधव लंडनला विमानतळावर उतरतो. तिथे त्याची भेट पूजा म्हणजे मृण्मयी लागू हिच्याशी होते. वडिल ओंकार हंपरवार यांनी त्याला न्यायला मर्सिडीज गाडी जरी पाठवलेली असली तरी त्याचे वैजाला पाच पैशाचेही अप्रूप नसते…त्याला केवळ बापाला जाब विचारायचा असतो की त्याला पंचवीस वर्ष पोरके करुन व गावात त्याच्या आईला खितपत बाप लंडनमध्ये कसा काय जगू शकत होता..?
पुढे काही कारणाने वैजाला मर्सिडीजमधून उतरावे लागते.
परक्या देशात जवळचे सामान हरवलेला वैजा विंडसरकडे चालत निघतो आणि त्याला वाटेत एक कुरीअर व्हॅनचा चालक बन्सीलाल म्हणजे मोहन जोशी भेटतो. पदोपदी पाउंड घेऊनच कामे करणाऱ्या बन्सीसोबत गोड तिखट राग रुसव्यांत वैजाचा प्रवास सुरु होतो .गंमत म्हणजे बन्सीच्याच व्हॅनमध्ये मागील बाजूस पूजाही बसलेली असते हे वैजाला जेंव्हा समजते तेंव्हा बन्सी पूजाची ओळख त्याच्या मालकाची मुलगी असल्याचे करुन देतो.
तिघांचाही विंडसरच्या दिशेने बारा तासांचा लांबलचक प्रवास सुरु होतो.
वाटेत वैजाचा गावरानपणा, बन्सीचा खोचकपणा आणि पूजाचा निष्पाप चांगुलपणा या तीन घटकांवर सिनेमा पुढे सरकतो.

विंडसरला जाईपर्यंत अनेकविध भावनांतून जाणारे वैजा,पूजा व बन्सी म्हणजे ‘मुक्काम पोस्ट लंडन’ हा सिनेमा.
वैजा ओंकार हंपरवारला म्हणजे त्याच्या वडिलांना भेटतो का..? पूजाचे काय होते..? बन्सीची साथ कुठपर्यंत असते हे सगळेच पहाणे रंजक ठरते.

कथा,पटकथा,दिग्दर्शन व संवाद यामध्ये केदार शिंदेंनी एकहाती चार खांब धरले आहेत.
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि संपूर्ण मातीच्या वासाचे संगित ही या सिनेमाची वैशिष्ट्ये.
अजित परब व ह्रषीकेश रानडेंचे संगित व गाणी लंडनच्या पार्श्वभूमीवर देखिल खरेच मन “महाराष्ट्र” करुन टाकतात.
निर्माता कमलशेठ यांची निर्मिती असलेला हा मुक्काम पोस्ट लंडन सिनेमा एमेझाॅन प्राईमवर उपलब्ध आहे.

एक अविस्मरणीय अनुभव म्हणून हा प्रवास आपण प्रेक्षक म्हणून जरुर करावा असाच आहे.

सुयोग पंडित

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उंच आपला सिनेमा (साप्ताहिक सदर)

मुक्काम पोस्ट लंडन

एखाद्या बिग बजेट मराठी सिनेमाची पटकथा केवळ तीन प्रमुख व्यक्तिरेखांना पडद्यावर ठेवून दाखवायचे धाडस कदाचित फक्त दिग्दर्शक केदार शिंदेच करु शकले असावेत. आजच्या दिवसांत ते कदाचित नवल वाटलं नसतं परंतु 1 जानेवारी 2007 साली प्रदर्शित झालेल्या मुक्काम पोस्ट लंडन या सिनेमाच्याबाबतीत ते धाडसच म्हणावे लागेल.

वैजनाथ ऊर्फ वैजा ओंकार हंपरवार हा सातार्यानजिकच्या एका खेड्यातल्या बापवेगळा तरुण. अस्सल गावरानपणा जपूनही कला शाखेचा पदवीधर असलेल्या वैजाची आई ही काळाच्याही पुढे राहून वैजाला वाढवलेली धोरणी बाई म्हणून तिचा वेगळाच सन्मान वैजाला कायम वाटत होता. वैजाच्या आईच्या द्रष्टेपणाने गावातल्या इतरांना व शैक्षणिक कार्यालाही खूप मदत झाली होती म्हणून वैजाच्या आईच्या निधनानंतर गावच्या शाळेला त्याच्या आईचे नांव आणि वैजाला शाळेमध्ये अध्यापकाची संधी असे दोन भावनिक योग जुळून येतात.
आईचे सर्व विधी आटोपल्यानंतर वैजा आईच्या आठवणीने आईची ट्रंक उघडतो.
इथे भरत जाधवचा वैजा पाहून अक्षरशः प्रत्येक मुलाला आईची आठवण आणल्यावाचून रहाणार नाही असा अभिनय भरतने केलाय…!
ती ट्रंक उघडताच खरा सिनेमा सुरु होतो. ट्रंकमध्ये एक छोटी पेटी असते जिच्यामध्ये स्कॉटलंड बॅन्केचे चार कोटीचे बेअरर चेक्स आणि सोबत लंडनची विमानाची दिडशे तिकिटे असतात. हे सर्व पाहून चक्रावून गेलेल्या वैजाला धक्काच बसतो. जीवनभर अतिशय साध्या व काटकसरीत जगत आलेले त्याचे बालपण ते चेक्स व एकूणच सर्व पाहून बुचकळ्यात पडते.
चौकशीअंती त्याला कळते की तो बापावेगळा जरी असला तरिही त्याचे वडिल म्हणजे ओंकार हंपरवार हे जिवंत आहेत आणि ते लंडनमधील विंडसर येथील एक खूप मोठे उद्योजक आहेत.
जीवनभर काटकसरीत जगलेल्या वैजाला वडिलांचा प्रचंड संताप येतो आणि तो त्यांच्या भेटीला लंडनला जायचे ठरवतो. वडिलांचा फोन नंबर शोधून तो त्यावर फोन करुन त्याच्या लंडनला येण्याची वादळी सूचनाही देतो. तो फोन प्रत्यक्ष त्याचे वडिलच उचलतात परंतु ते त्याच्या शब्दांना सामोरे जाऊ शकत नाहीत म्हणून कोणीतरी कर्मचारी बोलतायत असे खोटे सांगतात.

वैजा म्हणजे भरत जाधव लंडनला विमानतळावर उतरतो. तिथे त्याची भेट पूजा म्हणजे मृण्मयी लागू हिच्याशी होते. वडिल ओंकार हंपरवार यांनी त्याला न्यायला मर्सिडीज गाडी जरी पाठवलेली असली तरी त्याचे वैजाला पाच पैशाचेही अप्रूप नसते…त्याला केवळ बापाला जाब विचारायचा असतो की त्याला पंचवीस वर्ष पोरके करुन व गावात त्याच्या आईला खितपत बाप लंडनमध्ये कसा काय जगू शकत होता..?
पुढे काही कारणाने वैजाला मर्सिडीजमधून उतरावे लागते.
परक्या देशात जवळचे सामान हरवलेला वैजा विंडसरकडे चालत निघतो आणि त्याला वाटेत एक कुरीअर व्हॅनचा चालक बन्सीलाल म्हणजे मोहन जोशी भेटतो. पदोपदी पाउंड घेऊनच कामे करणाऱ्या बन्सीसोबत गोड तिखट राग रुसव्यांत वैजाचा प्रवास सुरु होतो .गंमत म्हणजे बन्सीच्याच व्हॅनमध्ये मागील बाजूस पूजाही बसलेली असते हे वैजाला जेंव्हा समजते तेंव्हा बन्सी पूजाची ओळख त्याच्या मालकाची मुलगी असल्याचे करुन देतो.
तिघांचाही विंडसरच्या दिशेने बारा तासांचा लांबलचक प्रवास सुरु होतो.
वाटेत वैजाचा गावरानपणा, बन्सीचा खोचकपणा आणि पूजाचा निष्पाप चांगुलपणा या तीन घटकांवर सिनेमा पुढे सरकतो.

विंडसरला जाईपर्यंत अनेकविध भावनांतून जाणारे वैजा,पूजा व बन्सी म्हणजे 'मुक्काम पोस्ट लंडन' हा सिनेमा.
वैजा ओंकार हंपरवारला म्हणजे त्याच्या वडिलांना भेटतो का..? पूजाचे काय होते..? बन्सीची साथ कुठपर्यंत असते हे सगळेच पहाणे रंजक ठरते.

कथा,पटकथा,दिग्दर्शन व संवाद यामध्ये केदार शिंदेंनी एकहाती चार खांब धरले आहेत.
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि संपूर्ण मातीच्या वासाचे संगित ही या सिनेमाची वैशिष्ट्ये.
अजित परब व ह्रषीकेश रानडेंचे संगित व गाणी लंडनच्या पार्श्वभूमीवर देखिल खरेच मन "महाराष्ट्र" करुन टाकतात.
निर्माता कमलशेठ यांची निर्मिती असलेला हा मुक्काम पोस्ट लंडन सिनेमा एमेझाॅन प्राईमवर उपलब्ध आहे.

एक अविस्मरणीय अनुभव म्हणून हा प्रवास आपण प्रेक्षक म्हणून जरुर करावा असाच आहे.

सुयोग पंडित

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.

error: Content is protected !!