चिंदर | विवेक परब :
१५ वा वित्त आयोग अंतर्गत आचरा चिंदर गणांतील ग्रामपंचायत आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब, बांदिवडे खुर्द, व बांदिवडे बुद्रुक, वायंगणी, तोंडवळी या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात स्थापन केलेल्या गणाची १५ वा वित्त आयोग सन २०२३-२४ वार्षिक आराखडा तयार करण्याकरीता प्रशिक्षण कार्यशाळा लौकिक सांस्कृतिक भवन आचरा येथे आयोजित करण्यात आलेली होती याला सर्वच स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद लाभला
या कार्यशाळेसाठी आचरा, चिंदर, गणातील उपस्थित संसाधन गटाचे आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, वायंगणी सरपंच संजना रेडकर , चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, बांदिवडे उपसरपंच पांडुरंग भांडे, तसेच प्रभारी अधिकारी प्रसाद चिंदरकर, संजय गोसावी, पर्यवेक्षक म्हणून श्रीम. के. ए. रसाळ, यु. पी. खोत, हजारे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्तरीय सदस्य, स्वयंसहाय्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्रामस्तरावरील विविध खात्यांचे (जि.प.व राज्य शासन अधिकारी/कर्मचारी आणि समुह संसाधन व्यक्ती (CRPS), ग्रामपंचायतीच्या संबंधित सर्व प्रशिक्षण घेणारा वर्ग उपस्थित होते.