१८ ते २१ नोव्हेंबर कालावधीत होणार गावपळण.
चिंदर | विवेक परब :
चिंदर गावची गावपळण ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. आज सकाळी चिंदर गावचा प्रधानदेव रवळणाथ मेळेकरी यांच्या पाशानाला बारा-पाच, मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कौल लावण्यात आला. देवाने उजवा कौल देत गावपळण होण्यास होकार दर्शवला.
गावपळण १८ ते २१ नोव्हेंबर मध्ये होणार आहे. १८ तारीखला गावातील लोक बाहेर पडणार असून साधारण २१ तारीखला देवाच्या हुकुमाने गाव भरणार आहे. मनुष्य आणि पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशी बाहेर वास्तव्य. पळणी बाबत असलेली लोकांची उत्सुकता संपलेली आहे. लोकांनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.