शिरगांव | संतोष साळसकर :
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा यांच्या वतीने आनंद रंग या कला ग्रुप तर्फे निमंत्रित केलेल्या भजन मंडळाच्या वारकरी रंगीत दिंडी नृत्य स्पर्धेत आई भगवती कला दिंडी तोरसोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
श्री देव रामेश्वर मंदिर आचरे येथे कार्तिक दशमी एकादशी निमित्ताने घेण्यात आलेल्या वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत आई भगवती कला दिंडी तोरसोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला यांना पाच हजार रुपये व राणेशाही चषक घेऊन गौरवण्यात आले.
तसेच भगवती प्रासादिक भजन मंडळ चिंदर यांचा द्वितीय क्रमांक आला त्यांना चार हजार रुपये बक्षिस आणि विठू रुक्माई भजन मंडळ आचरे यांना तृतीय क्रमांक मिळाला यांना तीन हजार रुपये बक्षीस दोघांनाही देऊन गौरविण्यात आले.