राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाअध्यक्ष अमित सामंत यांची वचनपूर्ती
बांदा | राकेश परब : बांदा बाजारपेठ मध्ये तेरेखोल नदीचे पाणी येत असल्याने नागरिकांना आगाऊ सुचना देता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील तीन सार्वजनिक मंडळांकडे सायरन (भोंगे) सुपूर्द करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते संबंधित मंडळांच्या पदाधिकार्यांकडे सायरन देण्यात आले.
यावर्षी मुसळधार पावसामुळे बांदा, इन्सुली भागात तेरेखोल नदी पात्राचे पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. अशा वेळी पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे बांदा, इन्सुली भागातील ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालत, आपले जीव वाचवले होते. या घटनेनंतर अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा, इन्सुली भागातील लोकांसाठी ‘लाईफ जॅकेट’ पुरविण्यात आली होती. यावेळी बांदा, इन्सुलीत ग्रामस्थांना अलर्ट करण्यासाठी सायरन देण्याचा, तसेच आपत्कालीन किट देण्याचा शब्द अमित सामंत यांनी दिला होता. त्यानुसार काल पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते बांदा, इन्सुलीतील मंडळांकडे हे सायरन सुपुर्द करत सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
येथील साई भक्त मंडळ, कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ बांदा, इन्सुलीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाकडे हे सायरन देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अमित सामंत यांनी केलेल्या कार्याच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कौतुक केले. यावेळी बांदा, इन्सुलीवासियांनी त्यांचे आभार मानले. तर गावासाठी केलेल्या मदतीबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, जिल्हा उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, राष्ट्रवादी युवा नेते असलम खतिब, बांदा ग्रामस्थ राकेश केसरकर, प्रितम हरमलकर, साईराज साळगावकर, राजेश विरनोडकर, रवींद्र मालवणकर, सुशांत पांगम, सुनील धामापूरकर, इन्सुलीचे श्री. पेडणेकर, श्री. शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर, श्री. नाईक, अर्चना पांगम, दर्शना केसरकर, संजय पालव, चेतन वेंगुर्लेकर, संजय भाईप, राकेश परब आदींसह बांदा, इन्सुली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अमित सामंत यांनी पूरस्थितीमध्ये नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. पूरस्थितीची माहिती मिळत नसल्याने बरीच वित्तहानी होते. ग्रामस्थांना पूराची माहिती वेळेत मिळाल्यास सावधानता बाळगून नुकसान कमी होण्यास मदत होईल. स्थानिकांच्या मागणीवरून सायरन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अन्वर खान तर आभार अक्रम खान यांनी मानले.