रविवारी सातरल गावातील शेतात जाऊन घेतला प्रत्यक्ष आढावा.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तहसिलदार आर. जे. पवार सध्या भात पिक कापणी सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांशी सवांद साधत आहेत. ते प्रत्यक्षात स्वतः भात पिक पाहणी करून भात पिकाचे किती उत्पन्न येते याबाबतचा खात्रीशीर आढावा घेत आहेत.
रविवारी ऐन सुट्टीच्या दिवशी कणकवली तालुक्यातील सातरल गावी संदीप लक्ष्मण राणे यांच्या शेतात सकाळी उपस्थित राहून स्वतः खात्री करून भात पिक उत्पन्नाबाबत परिपूर्ण माहिती घेतली.
यामध्ये शेतीच्या लागवडीचा दिनांक, शेतीसाठी वापरण्यात येणारे सेंद्रिय व रासायनिक खत, प्रती गुंठा भात पिकातून मिळणारे उत्पन्न, तसेच मिळणारे गवत याविषयी विस्तृत माहिती घेतली. तसेच शेतीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या व होणाऱ्या नुकसानीविषयी माहिती घेऊन त्याविषयी उपययोजनेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सातरल गावचे ग्रामसेवक राकेश गोवळकर, शेतकरी बंधू सदाशिव राणे, सुशिल राणे, संकेत राणे, सोहम राणे, अथर्व राणे, निखिल राणे आदी उपस्थित होते.