24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सूर्याची ‘प्रखर’ हातचलाखी..!

- Advertisement -
- Advertisement -

क्रिडा | विशेष : कालचा पर्थ येथील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा टी ट्वेंटी विश्वचषकाचा ऑप्टस स्टेडियमवरील सामना हा १९९० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन ‘वाका’ (पर्थ) च्याच खेळपट्टीची आठवण करुन देणारा होता.
संपूर्ण हिरवे आणि समतल मैदान आणि त्यावरील रसाळ अशी ताजी तवानी खेळपट्टी..!

पहिल्या चेंडूपासूनच यष्टीरक्षकाच्या तोंडासमोर किंवा डोक्यावरुन उसळी मारत काही दशांश सेकंदात सीमापार होणारे चेंडू….! अगदी त्याच धर्तीचा कालचा सामना होता.

प्रथम फलंदाजी करताना अशा खेळपट्टीवर २० षटकांत १३३ धावा म्हणजे धावांचा डोंगरच असतो…! एरवी अक्षरशः १३३ धावा म्हणजे आठवडी बाजारातील स्वस्त कांदे अचानक् भाववाढ झालेल्या कांद्याप्रमाणे भासतात.
काल तसेच झाले. दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी हा गुणी गोलंदाज नक्की आहेच परंतु काल तो अक्षरशः कंजूष व महागड्या विक्रेत्याच्या थाटात वावरला. रोहित शर्माला पुलशाॅट मारताना त्याच्या बॅटच्या स्टीकरपर्यंत चेंडू उसळवत त्याने त्याचा कालचा ‘प्राईस टॅग’ जाहीर केला. त्याला रबाडाच्या क्षेत्ररक्षक व गोलंदाजीची सुरेख साथ लाभली.
या सर्वात विराट,हार्दिक,के एल व रोहीत अशी महागडी गिर्हाईके त्याला लाभली.

हा सर्व अचाट व तुफान महागडा बाजार चालू असताना त्याच खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव नावाचे एक अफलातून गिर्हाईक बाजारपेठेतून एकेक धाव इतक्या सराईतपणे ‘चोरत’ होतं की अख्ख्या जगाला हेवा वाटेल..!

चोरी व हातचलाखी यातला फरक सूर्यकुमार यादव दाखवून देत होता. अक्षरशः सर्व कंजूष दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या बाजारात तो डोळ्यादेखत सर्व लुटत होता…! त्याची एकेरी दुहेरी धावांची चोरी नव्हती तर षटकार..चौकार व सकाराची ‘हातकी सफाई’ होती.

प्रथम फलंदाजी करताना ऑप्टस स्टेडियमवरील खेळपट्टी ही मिलर आणि मार्क्रम या दोघांना मिळाली तेंव्हा तिचे महागडेपण तितकेसे उरले नव्हते तरिही अर्षदीप,शमी,भुवनेश्वर या भारतीय व्यापार्यांनीही संपू पहाणारा पड बाजार उत्तम पैकी उचलून धरला..!

रसाळ खेळपट्टी वर सूर्याची प्रखरता…म्हणजे सूर्यकुमार यादवच्या ६८ धावा या १२० धावांच्याच तोडीच्या होत्या…आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या कालच्या खेळीसमोर इतर कोणाचीच तुलना अशक्य आहे…!

रोहित,विराट किंवा हार्दिक यांना दोष देऊन खरेच उपयोग नाही आणि अश्विनलाही नाही कारण जर चारच मुख्य गोलंदाज निवडलेत तर अश्विनला संपूर्ण कोटा गोलंदाजी देणे हे अत्यावश्यक आहेच.

सामना भारत हरला तरिही तो शांतपणे व प्रसन्न पणे सामना म्हणून पाहू द्यायची कमाल त्यात होती. मार्क्रम व मिलरला त्यांच्या अर्धशतकांबद्दल विजयाचे श्रेय द्यावेच लागेल परंतु फलंदाज म्हणून काल सूर्यकुमार यादवच्या प्रखरते समोर सर्व फिके होते.

सामन्याचा भारतासाठी एकच कच्चा बिंदू शोधला तर सापडेल तो म्हणजे ‘मार्क्रमच्या एका षटकात फक्त ५ धावाच’ भारत जमवू शकला…!

बाकी सबकुछ सूर्याची प्रखर व उत्तम हातचलाखीच.!

(आपली सिंधुनगरी क्रीडा विशेष )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रिडा | विशेष : कालचा पर्थ येथील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा टी ट्वेंटी विश्वचषकाचा ऑप्टस स्टेडियमवरील सामना हा १९९० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन 'वाका' (पर्थ) च्याच खेळपट्टीची आठवण करुन देणारा होता.
संपूर्ण हिरवे आणि समतल मैदान आणि त्यावरील रसाळ अशी ताजी तवानी खेळपट्टी..!

पहिल्या चेंडूपासूनच यष्टीरक्षकाच्या तोंडासमोर किंवा डोक्यावरुन उसळी मारत काही दशांश सेकंदात सीमापार होणारे चेंडू….! अगदी त्याच धर्तीचा कालचा सामना होता.

प्रथम फलंदाजी करताना अशा खेळपट्टीवर २० षटकांत १३३ धावा म्हणजे धावांचा डोंगरच असतो…! एरवी अक्षरशः १३३ धावा म्हणजे आठवडी बाजारातील स्वस्त कांदे अचानक् भाववाढ झालेल्या कांद्याप्रमाणे भासतात.
काल तसेच झाले. दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी हा गुणी गोलंदाज नक्की आहेच परंतु काल तो अक्षरशः कंजूष व महागड्या विक्रेत्याच्या थाटात वावरला. रोहित शर्माला पुलशाॅट मारताना त्याच्या बॅटच्या स्टीकरपर्यंत चेंडू उसळवत त्याने त्याचा कालचा 'प्राईस टॅग' जाहीर केला. त्याला रबाडाच्या क्षेत्ररक्षक व गोलंदाजीची सुरेख साथ लाभली.
या सर्वात विराट,हार्दिक,के एल व रोहीत अशी महागडी गिर्हाईके त्याला लाभली.

हा सर्व अचाट व तुफान महागडा बाजार चालू असताना त्याच खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव नावाचे एक अफलातून गिर्हाईक बाजारपेठेतून एकेक धाव इतक्या सराईतपणे 'चोरत' होतं की अख्ख्या जगाला हेवा वाटेल..!

चोरी व हातचलाखी यातला फरक सूर्यकुमार यादव दाखवून देत होता. अक्षरशः सर्व कंजूष दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या बाजारात तो डोळ्यादेखत सर्व लुटत होता…! त्याची एकेरी दुहेरी धावांची चोरी नव्हती तर षटकार..चौकार व सकाराची 'हातकी सफाई' होती.

प्रथम फलंदाजी करताना ऑप्टस स्टेडियमवरील खेळपट्टी ही मिलर आणि मार्क्रम या दोघांना मिळाली तेंव्हा तिचे महागडेपण तितकेसे उरले नव्हते तरिही अर्षदीप,शमी,भुवनेश्वर या भारतीय व्यापार्यांनीही संपू पहाणारा पड बाजार उत्तम पैकी उचलून धरला..!

रसाळ खेळपट्टी वर सूर्याची प्रखरता…म्हणजे सूर्यकुमार यादवच्या ६८ धावा या १२० धावांच्याच तोडीच्या होत्या…आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या कालच्या खेळीसमोर इतर कोणाचीच तुलना अशक्य आहे…!

रोहित,विराट किंवा हार्दिक यांना दोष देऊन खरेच उपयोग नाही आणि अश्विनलाही नाही कारण जर चारच मुख्य गोलंदाज निवडलेत तर अश्विनला संपूर्ण कोटा गोलंदाजी देणे हे अत्यावश्यक आहेच.

सामना भारत हरला तरिही तो शांतपणे व प्रसन्न पणे सामना म्हणून पाहू द्यायची कमाल त्यात होती. मार्क्रम व मिलरला त्यांच्या अर्धशतकांबद्दल विजयाचे श्रेय द्यावेच लागेल परंतु फलंदाज म्हणून काल सूर्यकुमार यादवच्या प्रखरते समोर सर्व फिके होते.

सामन्याचा भारतासाठी एकच कच्चा बिंदू शोधला तर सापडेल तो म्हणजे 'मार्क्रमच्या एका षटकात फक्त ५ धावाच' भारत जमवू शकला…!

बाकी सबकुछ सूर्याची प्रखर व उत्तम हातचलाखीच.!

(आपली सिंधुनगरी क्रीडा विशेष )

error: Content is protected !!