शेतकरी शिबिरात वन्यप्राण्यांच्या खाद्याची सोय करण्यासाठी निवेदन….!
श्रावण | गणेश चव्हाण :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांचे अंतर्गत माझा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम ग्रामपंचायत श्रावण येथे तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शिबीरात, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी एम. आर. इ जी .एस या योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच आत्मा अंतर्गत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची माहिती दिली.
शेतकऱ्यांना गवारेड्या माकड व वन्यजीवांपासून होणाऱ्या त्रासा संदर्भात निवेदन दिले. शेतकरी यांच्या साठी वन्यजिवांपासून मोठा त्रास होत असल्याने, कृषी विभागाने काहीतरी ठोस अशा उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. शेतकर्यांनी या निवेदनात जंगलामध्ये काही खाद्य नसल्याने माकड किंवा गावारेडे यां सारखे वन्यप्राणी लोक वस्तीत येऊन शेतकऱ्यांच्या शेतांची प्रसंगी घरातील वस्तूंची नासधूस करतात. तोंडाशी आलेल शेत उध्वस्त करतात. त्यामुळे जंगलात खाद्य निर्माण करण्याची सुचना केली. यावेळी रामगड चे कृषी पर्यवेक्षक डी. के सावंत यांनीही उपस्थितांना योग्य असे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच सौ हर्षदा चव्हाण, सौ. रागिनी पवार, दिपक घाडी, सर्कल सुनील पवार, तलाठी एन. एस. देसाई, कृषी सहाय्यक ए. डी. कुरकुटे, रामगड कृषीसहाय्यक ए. आर. धुरी, प्रकाश बागवे, श्रीधर पुजारे, रामदास पवार, बाबी मोघे, श्याम परब, विलास मोघे, मंगेश यादव, पांडुरंग परब, प्रकाश येरम, बापू परब आदी शेतकरी उपस्थित होते.