विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :
शिवराज्य बिग्रेड मालवण तालुका अध्यक्षपदी आचरा येथील अश्विन रमाकांत हळदणकर यांची निवड करण्यात आली. कणकवली येथे ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग शिवराज्य बिग्रेड अध्यक्ष सुनील पारकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे महेश राणे, शेखर राणे, भास्कर राणे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
हळदणकर यांच्या निवडी नंतर त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.