श्रावण | गणेश चव्हाण :
महात्मा गांधी विद्यालय श्रावण नं.१ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका साक्षी कुबल यांनी बँकिंग व्यवहार कसे करावे याचे प्रात्यक्षिकासह बॅंकिंग शिक्षण, श्रावण बँकेत शाखाधिकारी श्री गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्याने बँकेत पैसे भरणे, काढणे, खाते उघडणे इ. व्यवहार कसे करायचे याचे ज्ञान घेतले.
यावेळी इयत्ता सातवीचे विद्यार्थी अथर्व गवळी, निमिषा परब, रेवती लाड, कुणाल परब नीरजा परब, वेदांत परब, राजाराम परब व संजिवनी बाईत. आदी विद्यार्थ्याने हे बँकिंग व्यवहाराचे प्रशिक्षण घेतले. श्रावण शाळा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. विविध उपक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असते. मुख्याध्यापिका सौ. स्मिता किंजवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक शिक्षक, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाद्वारे शैक्षणिक तसेच सामाजिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून शाळेसह शिक्षकांचे कौतुक होत आहे.