विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे आलेले उद्योजक किरण सामंत यांनी शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केलेल्या रामेश्वर वाचनालयास भेट देवून वाचनालयातर्फे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, समिती सदस्य अशोक कांबळी, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे, ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, सौ कामिनी ढेकणे,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संदेश सावंत, महेश राणे, तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.