बांदा | राकेश परब :
येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे.
स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये रोख, सन्मानपत्र व स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर स्मृती चषक देण्यात येणार आहे. लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे २०००, १०००, ५०० रुपये रोख, सन्मानपत्र व चषक देण्यात येणार आहे. दोन्ही गटात उत्तेजनार्थ पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) किंवा अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) यांच्याकडे २३ ऑक्टोबर पर्यंत नावनोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, कार्यवाह समीर परब, खजिनदार भूषण सावंत यांनी केले आहे.