श्रावण | गणेश चव्हाण :
शेतकर्यांच्या तोंडात आलेला घास पावसाने हिराऊन घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वच बाजुने नुकसानग्रस्त झालेल्या, शेतकर्यांना आत्महत्येचा विचार स्पर्श करण्या अगोदर सरकारने कोकणांत, ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी श्रावण माजी सरपंच अंकुश लाड यांनी शेतकर्यांच्या वतीने केली आहे.
गेल्या पाच वर्षापासुन नोटबंदी, कोरोना यांमुळे बेजार होऊन, जीवनात विश्व दारीद्र गरीबी व उद्योगधंदे नसल्याने आर्थिक अडचणीत असलेले, हे सर्वसामान्य शेतकरी, आता वन्य प्राणी व किटकांचा त्रास, अतिवृष्टीचा पाऊस तर कधी निसर्गातील बदल यांमुळे कंटाळलेला आहे. रामगड श्रावण परीसरात भातपिक कापणीला आले असुन शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. काही ठिकाणी शेतातच, भात बियाणाला नवे कोंब आले आहेत. भात पिक जाग्यावरच असल्याने डुक्कर, गवारेडे, वानर, ऊंदिर, मोर, पक्षी, किड असे वन्यजीव हाता तोंडाशी आलेले शेत (अन्न) उध्वस्त करतांना पहाव लागत आहे. कर्ज काढुन बि बियाणे खते मजुरदार घालुन शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत. काही शेतकरी तर पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे अगदी आत्महत्तेचाही विचार करत आहेत. याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा व शेतकर्यांना वाचवावे अशी मागणी श्रावणचे माजी सरपंच अंकुश लाड यांनी केली आहे.